भारताने अनुकरण नव्हे, तर नेतृत्व करावे !

१. ‘आपला भारत आपला इतिहास, धर्म आणि संस्कृती यांच्या पायावर भक्कम उभा राहून संपूर्ण जगाचे नेतृत्व नक्कीच करू शकतो.

२. पाश्चिमात्य विचारधारा केवळ भौतिक सुखासाठी धडपडणारी आणि भारतियांचे उद्दिष्ट ईश्वरप्राप्ती असणे 

पाश्चिमात्य विचारधारा केवळ भौतिक सुखासाठी आणि तथाकथित विकास अन् प्रगतीसाठी धावपळ करणारी आहे. त्यांचे तेवढे सीमित उद्दिष्ट आहे. आमचे उद्दिष्ट ईश्वरप्राप्ती आहे. ते कसे पूर्ण होणार ?, तर त्यासाठी धर्माचरण आहे. आमच्याकडे धर्माला अविरोधी अशी राजकीय भरभराट आणि भौतिक सुखसंपत्तीला विरोध नाही; परंतु आमचे चक्रवर्ती सम्राटही ज्ञान आणि वैराग्य यांसमोर नित्य नतमस्तक असत अन् आपल्या उत्तर आयुष्यात तोच निवृत्तीचा मार्ग पत्करत असत.

३. भारतीय राजनीतीकडेच विश्व संवर्धनाची क्षमता असणे

आजही आमच्या शासनाची अशी त्यागपूर्ण स्थिती भारतीय राजनीतीच्या भक्कम आधारशिलेवर उभी करणे अशक्य नाही; कारण आजही जगातील कोणत्याही देशाच्या राजनीतीत भारतीय राजनीतीत असलेले भक्कम, ठोस, सुगम आणि सुसंगत असे अन् परमोत्कर्षाला हमखास नेणारे असे निर्देशन नाही; म्हणून भारतीय राजनीतीच विश्व संवर्धनाची क्षमता बाळगते; म्हणूनच आम्ही म्हणतो, ‘भारताने नेतृत्व करावे, अनुकरण नव्हे.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०२२)