शाहरूखसोबत विवाह करणार्‍या टिवंकल यादवची इस्लाम न स्वीकारल्यामुळे हत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

फरीदाबाद – येथील टिवंकल यादव या हिंदु तरुणीने शाहरूख नावाच्या मुसलमान तरुणासोबत विवाह केला. त्यानंतर तिच्यावर हिंदु तरुणीवर मांस खाण्यास आणि  इस्लाम स्वीकारण्यास दबाव टाकला जाऊ लागला. टिवंकल हिने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली, असा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.

२४ वर्षीय टिवंकल यादव ही मूळची उत्तरप्रदेशातील अमेठी येथील आहे. टिवंकल हिने ३ वर्षांपूर्वी मेवात येथील शाहरूखशी तिच्या कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. ‘शाहरूख आणि त्याचे कुटुंबीय टिवंकलवर धर्मांतरासाठी दबाव टाकत होते. शाहरूखची आई टिवंकल हिला ‘हिंदु’ संबोधून तिच्या हातचे पाणीही पित नव्हती आणि धर्मांतरासाठी तिचा छळ करत होती. शाहरूखने २० जानेवारी या दिवशी केलेल्या बेदम मारहाणीमुळे टिवंकल हिचा मृत्यू झाला’, असा आरोप टिवंकलचा भाऊ सुमित यादव यांनी पोलिसांत प्रविष्ट केलेल्या तक्रारीत केला आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

मुसलमानासोबत विवाह करणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य संपवणे, हे हिंदु युवती जाणतील, तो सुदिन !