आरोग्‍यदायी दिनक्रम

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३४

आरोग्‍याविषयी शंकानिरसन

वैद्य मेघराज पराडकर

सौ. दीप्‍ती आगाशे, रत्नागिरी : आरोग्‍यप्राप्‍तीसाठी केवळ २ वेळा जेवणे कठीण वाटते. अजून काही सोपे पर्याय आहेत का ?

उत्तर :

१. दिनक्रम असा असावा

अ. सकाळी ६.३० पूर्वी उठावे.
आ. अर्धा घंटा व्‍यायाम करावा.
इ. व्‍यायामानंतर १५ मिनिटांनी अंघोळ करावी.
ई. सकाळी ११ वाजल्‍यानंतर अल्‍पाहार करावा किंवा थेट दुपारचे जेवण करावे. तोपर्यंत भूक लागल्‍यास केवळ पाणी प्‍यावे. चहा घेऊ नये.
उ. दुपारी अर्ध्‍या घंट्याच्‍या वर झोपू नये.
ऊ. रात्री ८.३० पूर्वी जेवावे.
ए. रात्री ११.३० पूर्वी झोपावे.

२. दिनक्रमाची वैशिष्‍ट्ये

अ. या दिनक्रमामध्‍ये केवळ सकाळी ११ वाजेपर्यंतच स्‍वतःवर संयम ठेवायचा असल्‍याने हे करणे अत्‍यंत सोपे आहे.
आ. दुपारच्‍या जेवणापासून रात्रीच्‍या जेवणापर्यंत मध्‍ये काही न खाणे आदर्श आहे; परंतु हे शक्‍य नसेल, तर त्‍या कालावधीत मध्‍ये खाणे फारसे त्रासदायक ठरत नाही. असे असले, तरी वारंवार खाणे टाळावे.
इ. यामध्‍ये आरोग्‍यप्राप्‍तीसाठी कोणतेही औषध घेण्‍यास सांगितलेले नाही.
ई. चहा सोडू इच्‍छिणार्‍यांसाठीही हा दिनक्रम उपयुक्‍त आहे. यामध्‍ये आरंभी सकाळी ११ वाजेपर्यंत चहा घेऊ नये. दुपारी चहा घेतल्‍यास चालेल; परंतु चहा सोडण्‍याचे ध्‍येय ठेवून तोही हळूहळू सोडावा.
उ. वरील दिनक्रमामध्‍ये आहार, उपवास, व्‍यायाम आणि झोप यांचा पुरेसा समतोल साधलेला आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)

♦ नेमाने कृती करा आणि झालेले लाभ कळवा ! ♦
संपर्क : [email protected]