‘गुरुदेवा, स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जपण्‍याचा माझा मिथ्‍या अहं नष्‍ट करा’, अशी तुमच्‍या चरणी प्रार्थना !

सौ. स्वाती शिंदे

‘गुरुदेवा, या जिवावर सर्वस्‍वी तुमचा अधिकार असतांनाही माझे मन मात्र तसा विचार करायला न्‍यून पडून स्‍वतःचे स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जोपासते. माझे मन कधी कधी ऐकण्‍याची भूमिका घेते, तर कधी बंडखोरीही करते.

‘गुरुदेवा, स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जपण्‍याचा माझा हा मिथ्‍या अहं नष्‍ट करून या जिवावर असलेल्‍या आपल्‍याच स्‍वामित्‍वाची आणि आपल्‍याच मालकी हक्‍काची मला जाणीव होऊन तुमच्‍या चरणी अखंड दास्‍यभावात रहाता येऊ दे’, हीच माझी तुमच्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’

– सौ. स्‍वाती शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२२)