‘देशातील पुढील ५०-१०० वर्षांत मुसलमान शासन आल्यावर राममंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाईल !’

‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे फुत्कार !

‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी (डावीकडे)

नवी देहली – आज मुसलमान गप्प आहेत. माझी येणारी पिढी, माझा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा नातू यांच्यासमोर ५० किंवा १०० वर्षांनी एक इतिहास समोर येईल कि आमची मशीद तोडून तेथे मंदिर बांधण्यात आले. कदाचित् त्यावेळी एखादा मुसलमान शासनकर्ता किंवा मुसलमान न्यायाधीश असू शकेल. ‘त्या वेळी काय पालट होईल ?’, हे  काही सांगता येत नाही. मग त्या इतिहासाच्या आधारे मंदिर तोडून मशीद पुन्हा बनवली जाऊ शकत नाही का ? निश्‍चित बनवली जाईल, असे विधान ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना (इस्लामी अभ्यासक) साजिद रशिदी यांनी ‘टाइम्स नाऊ नवभारत’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलतांना केले. या वेळी त्यांनी हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

  • सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही मुसलमानांच्या मनात असे विचार आहेत, हे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, कायदाप्रेमी लक्षात घेतील का ? यावर ते तोंड उघडतील का ?
  • ‘येत्या ५०-१०० वर्षांत भारतात मुसलमान शासक येणार’, हे मुसलमान कोणत्या आधारे सांगतात, याचा विचार हिंदू कधी करणार ? ही स्थिती लक्षात घेता हिंदू आतातरी जागृत आणि संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थपना करून देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करणार आहेत का ?