‘२२.१०.२०२२ या दिवशी आम्ही तिघे (मी, माझे यजमान (सद्गुरु राजेंद्र शिंदे) आणि आमची मुलगी कु. वैदेही) सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा आम्हाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. प्रीती
१ अ. सद्गुरु कुवेलकरआजी आमची आतुरतेने वाट पहात होत्या.
१ आ. सुनेला मुलीप्रमाणे वागवणे : सद्गुरु कुवेलकरआजींनी आम्हाला सांगितले, ‘‘माझी सून (सौ. रूपा) माझी इतकी सेवा करते की, आमचे नाते ‘सासू-सून’ असे नाही, तर ‘आई आणि मुलगी’, असे आहे.’’ तेव्हा त्यांच्या सुनेने सांगितले, ‘‘आईंनी मला कधीच सून म्हणून वागवले नाही. त्यांनी मला नेहमीच समजून घेतले. त्यांच्याच कृपेमुळे मी त्यांची सेवा करू शकते आणि आश्रमात सेवा करण्यासाठी जाऊ शकते.’’
२. सद्गुरु कुवेलकरआजींच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्यांच्यामध्ये नम्रता, लीनता आणि कृतज्ञताभाव अधिक जाणवतो.
३. चांगली दृष्टी
त्यांचे वय ८९ वर्षे आहे. त्यांना दैनंदिन कृती करतांना आणि वाचतांनाही उपनेत्र (चष्मा) लावावे लागत नाही.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव
अ. त्या आमच्याशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मी नामजप करू शकत आहे. त्यांच्या कृपेमुळेच माझ्या कुटुंबातील सर्व जण साधना करत आहेत.’’ सद्गुरु आजींचा एकेक शब्द मला एखाद्या बालकाच्या बोलण्याप्रमाणे वाटत होता.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सद्गुरु कुवेलकरआजींच्या घरी आले होते. त्याविषयी बोलतांना त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘मी काहीच करत नाही, तरी देव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मला भेटायला आला.’’
त्यांच्या बोलण्यातून ‘त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती उच्च कोटीचा कृतज्ञताभाव आहे’, हे माझ्या लक्षात आले.
५. अनुभूती
अ. सद्गुरु आजी शारीरिकदृष्ट्या अशक्त दिसल्या, तरी त्यांचा चेहरा तेजस्वी आणि चैतन्यमय आहे.
आ. सद्गुरु आजींकडे पाहून माझे मन एकदम शांत झाले आणि मला आनंदाची अनुभूती आली.
इ. सद्गुरु आजी देहाने कृश आहेत, तरीही मी त्यांचा हात हातात घेतल्यावर मला त्यांच्या स्पर्शातून प्रीती जाणवली.
ई. आम्ही तिघांनी त्यांच्या हाताला स्पर्श केल्यावर आम्हाला त्यांचे दोन्ही हात थंड, मुलायम आणि गुळगुळीत असल्याचे जाणवत होते.
उ. त्यांच्या गादीला स्पर्श केला असता ‘त्या गादीतूनही चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
ऊ. ‘सद्गुरु आजी रहात असलेली वास्तूही चैतन्यमय झाली आहे’, असे आम्हाला जाणवले.
ए. सौ. रूपा कुवेलकर यांनी आम्हाला परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सद्गुरु आजींना भेटायला आले असतांनाची छायाचित्रे दाखवली. आम्हाला ती छायाचित्रे पहातांना पुष्कळ आनंद वाटला आणि आमचा कृतज्ञताभाव जागृत झाला.
६. सद्गुरु कुवेलकरआजींनी दिलेला आशीर्वाद
सद्गुरु आजींच्या घरून निघतांना आम्ही त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. तेव्हा त्यांनी आम्हा तिघांना ‘तुमची साधना चांगली होऊ दे’, असा आशीर्वाद दिला.
सद्गुरु कुवेलकरआजींचा आम्हा तिघांना सत्संग लाभला. त्याबद्दल परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु आजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! परात्पर गुरुदेव, ‘तुमचा आमच्यावर सदैव आशीर्वाद राहू दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा. (७.११.२०२२)
आनंदी आणि संतांप्रती कृतज्ञताभाव असलेल्या कवळे, गोवा येथील सौ. रूपा कुवेलकर (सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांची सून) !
१. सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. आनंदी : ‘सौ. रूपाताईंना शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही त्या हसतमुख अन् आनंदी असतात. त्या कधीही त्यांना होणार्या त्रासांविषयी सांगत नाहीत.
१ आ. कृतज्ञताभाव
१ आ १. सद्गुरु कुवेलकर आजींप्रती कृतज्ञताभाव : ताईंमध्ये सनातन संस्थेच्या सद्गुरु कुवेलकर आजींप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. ‘सद्गुरु आजींमधील चैतन्याचा मला लाभ होतो. सद्गुरु आजी माझी आईप्रमाणे काळजी घेतात. मी त्यांना माझ्या मनातील सगळे सांगू शकते’, असे ताई नेहमी सांगतात.
१ इ २. आश्रम आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती कृतज्ञताभाव : ‘बाहेरच्या जीवनापेक्षा आश्रमजीवन पुष्कळ चांगले आहे. सनातनच्या आश्रमांत रहाणारे साधक भाग्यवान आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे मला आश्रमात यायला मिळते. त्यामुळे मला चैतन्य मिळते’, असे ताई सांगतात.
१ ई. सौ. रूपाताईंमध्ये जाणवलेले पालट
१. पूर्वीच्या तुलनेत ताई अधिक उत्साही आणि आनंदी दिसतात.
२. पूर्वी त्यांना ‘टंकलेखनाची सेवा करायला जमणार नाही’, असे वाटायचे. त्या आता चांगली सेवा करतात.’
२. सौ. सुचेता नाईक, फोंडा, गोवा.
प्रेमभाव : ‘सौ. रूपाताई आश्रमातील बालसाधक आणि अन्य साधक यांच्यासाठी मधूनमधून खाऊ आणतात. त्या साधकांच्या घरातील सदस्यांची विचारपूस करतात.’
३. सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा.
‘‘सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजींच्या सूनबाई सौ. रूपा निर्मळ मनाच्या आहेत’’, असे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.’ (२८.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |