पू. (सौ.) अश्विनीताई आहेत दैवी गुणांची खाण ।

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

‘वयाने लहान असूनही अध्यात्मात आहेत खूप महान ।

पू. (सौ.) अश्विनीताई आहेत दैवी गुणांची खाण ।। १ ।।

साधकांना वात्सल्याने आधार देती पू. अश्विनीताई ।

आश्रमातील सर्व साधकांची आहे ‘आध्यात्मिक आई’ ।। २ ।।

प.पू. गुरुमाऊलींचा ध्यास सतत त्यांच्या अंतरी असे ।

वाणीत प.पू. गुरुमाऊलींप्रती अपार श्रद्धा अन् भाव दिसे ।। ३ ।।

कु. स्वाती शिंदे

‘प.पू. गुरुमाऊली, आपल्या कृपाशीर्वादामुळे माझ्यासारख्या क्षुद्र जिवाला पू. अश्विनीताईंचा सत्संग मिळत आहे, त्यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे श्रीकृष्णा, पू. अश्विनीताईंच्या सारखी समष्टी तळमळ, प्रीती, व्यापकत्व, शिकण्याची वृत्ती इत्यादी गुण आम्हालाही शिकता येऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’

– कु. स्वाती शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०१९)