बांगलादेशातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आम्हाला साहाय्य करा !

‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेचे आवाहन  

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – मुसलमान धर्मगुरु बांगलादेशातील हिंदु मुला-मुलींचे धर्मांतर करत आहेत आणि त्यांचे मुसलमान मित्र त्यांना या कामात साहाय्य करत आहेत. इस्लाम धर्म स्वीकारणार्‍यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी बांगलादेशच्या धर्मनिरपेक्ष सरकारने ‘न्यू मुस्लिम फंड’ची निर्मिती केली आहे. ते थांबवण्यासाठी आम्ही साहाय्य  मागत आहोत, असे आवाहन ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून केले आहे.

संपादकीय भूमिका

  • भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी काही करणार का ?, असा प्रश्‍न हिंदूंच्याही मनात उपस्थित होत आहे !