भारत विकसित करत असलेल्या इराणमधील चाबाहार बंदराला तालिबानचे समर्थन !

सुरक्षा आणि सुविधा पुरवण्याचे आश्‍वासन !

इराणमधील चाबाहार बंदर

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने प्रथमच भारताचे समर्थन केले आहे. भारताकडून इराणमधील चाबाहार बंदर व्यापारनिमित्त विकसित करण्यात येत आहे. याचे तालिबान सरकारने समर्थन केले आहे. ‘भारताला या बंदरातून व्यापार करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा आणि सुरक्षा पुरवू’, असे सांगत चाबाहार बंदराला ‘उत्तर-दक्षिण आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट कॉरिडोर’मध्ये सहभागी करण्याचेही तालिबानने स्वागत केले आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानकडून या बंदराच्या संदर्भात भारताचा विरोध केला जात असतांना तालिबानने हे समर्थन दिले आहे. ‘उत्तर दक्षिण आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट कॉरिडोर’ भारताची आर्थिक राजधानी मुंबईला रशियाची राजधानी मास्को शहराशी जोडतो. हा मार्ग इराण आणि रशियाच्या जवळ असलेल्या अझरबैझान देशांतून जातो.