मुंबईमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेत विद्यार्थ्यांकडून बलात्कार !

मुंबई – शहरातील माटुंगा येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत १३ वर्षांच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच विद्यार्थ्यांनी बलात्कार केला. या प्रकरणी २ विद्यार्थ्यांवर ‘पोक्सो’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर या दिवशी हा संतापजनक प्रकार घडला.

 (सौजन्य : HM News)

शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य सभागृहात बोलावण्यात आले असतांना विद्यार्थ्यांनी पीडित मुलीला रोखले. त्यानंतर २ विद्यार्थ्यांनी मुलीवर अत्याचार केले. विद्यार्थिनीवर अत्याचार होत असतांना २ विद्यार्थ्यांनी वर्गाच्या बाहेर पहारा दिल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. विद्यार्थिनीला झालेल्या त्रासानंतर पालकांनी विचारणा केल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. या प्रकरणी ३० नोव्हेंबर या दिवशी पालकांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका

ज्या वयात शिक्षण घ्यायचे असते, त्या वयातील मुले स्वतःच्या वर्गातील मुलीवर बलात्कारासारखे हीन कृत्य करत असतील, तर हे समाजाचे घोर अधःपतन झाल्याचे द्योतक आहे ! नीतीवान आणि सदाचारी पिढी घडण्यासाठी मुलांना लहानपणापासून साधना शिकवा !