‘श्याम’ बनून हिंदु विद्यार्थिनीला जाळ्यात ओढणार्‍या समीर रजा याला अटक

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे समीर राजा नावाच्या मुसलमान तरुणाने ‘श्याम’ नावाने सामाजिक माध्यम ‘स्नॅपचॅट’वर खाते उघडले होते. त्याद्वारे १२ वीमध्ये शिकणार्‍या एका हिंदु विद्यार्थिनीशी त्याने मैत्री केली. या वेळी त्याने त्याचे नाव ‘लकी’ असे सांगितले होते. नंतर समीर याने तिची काही छायाचित्रे मागितली. नंतर एका उपाहारगृहात त्याने तिला भेटायला बोलावले. या वेळी या विद्यार्थिनीला त्याच्याविषयी संशय आला. तिला तो समीर रजा असल्याचे समजले. यामुळे समीर तिला तिच्या छायाचित्राच्या माध्यमांतून ब्लॅकमेल करू लागला. तसेच तिला धर्मांतर करून विवाह करण्यासाठी दबाव टाकू लागला. या काळात तिच्याकडून काही पैसेही उकळले. याची माहिती तरुणीने कुटुंबियांना सांगितली. त्यावर त्यांनी समीर याला घरी बोलावले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करण्यात आल्यानंतरही अशा घटना थांबलेल्या नाहीत. यासाठी आता या कायद्यामध्ये अधिक कठोर आणि तात्काळ शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक !