ख्रिस्त्यांप्रमाणे मुसलमानांनी वाढदिवस साजरा करू नये !  – देवबंद दारुल उलूम

अलीगड (उत्तरप्रदेश) – देवबंद दारुल उलूमने प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये मुसलमानांनी ख्रिस्त्यांप्रमाणे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे.

मौलाना (इस्लामचा अभ्यासक) असद कासमी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मुसलमानांनी कुराणानुसार सांगितलेल्या मार्गावर चालायला हवे. त्यांनी ख्रिस्त्यांच्या प्रथा आणि परंपरा अवलंबण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे. महंमद पैगंबर यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी वाढदिवस साजरा केल्याचा उल्लेख नाही किंवा त्यांच्या सहकार्‍यांचाही वाढदिवस साजरा केला नाही. मुसलमानांनी वाढदिवस साजरा करणे माझ्या बुद्धीला समजण्याच्या बाहेरची गोष्ट आहे. एखादी व्यक्ती अन्य धर्मियांच्या प्रथांचा अवलंब करत असेल, तर तिला प्रलयाच्या वेळी शिक्षा मिळेल. विवाहाच्या काळात ‘डीजे’ (मोठी संगीत यंत्रणा) लावणेही चुकीचे आहे. तसेच विवाहामध्ये घोड्यावर बसणे आणि आतिषबाजी करणे हेही इस्लामनुसार चुकीचे आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?
  • हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे आता याविषयी बोलणार नाहीत !