रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर कराड येथील श्रीमती अनिता भोसले यांना आलेल्या अनुभूती

मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने रामनाथी आश्रमात सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीमती अनिता भोसले

१. ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती

१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरण पादुकांमधून उदबत्तीचा धूर निघत आहे’, असे दिसणे आणि भावपूर्ण नामजप होणे : ‘एकदा मी सकाळी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा ‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरण पादुकांमधून उदबत्तीचा धूर निघत आहे’, असे मला दिसले. त्या वेळी माझे मन एकाग्र होऊन माझा नामजप भावपूर्ण झाला.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील आज्ञाचक्रावर लावलेल्या कुंकवाच्या टिळ्यातून नामजपाचे शब्द साधिकेकडे येत असून तो नामजप साधिकेच्या हृदयात जात असल्याचे तिने अनुभवणे : एकदा मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा माझा नामजप एकाग्रतेने होत नव्हता. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप केल्यावर ‘त्यांच्या आज्ञाचक्रावर लावलेल्या कुंकवाच्या टिळ्यातून नामजपाचे शब्द माझ्या दिशेने येत आहेत आणि माझ्या मुखातून हृदयात जात आहे’, असे मी अनुभवले.

२. अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना आलेल्या अनुभूती 

२ अ. ‘पू. रेखा काणकोणकर अन्नपूर्णामाता असून त्या अन्नपूर्णाकक्षात सेवा करणार्‍या साधकांना चैतन्य प्रदान करत आहेत’, असे जाणवणे : एकदा गुरुदेवांच्या कृपेने मला रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात दुपारी चहा करण्याची सेवा मिळाली होती. त्या वेळी ‘पू. रेखाताई अन्नपूर्णामाता आहेत आणि त्या अन्नपूर्णाकक्षात सेवा करणार्‍या साधकांना चैतन्य प्रदान करत आहेत’, असे मला जाणवले. त्या स्वतः ‘प्रत्येक पदार्थ कसा झाला आहे ?’, हे बघून तो पदार्थ भोजनकक्षात पाठवत होत्या. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांची किती काळजी घेतात !’, असे वाटून माझी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२ आ. एकदा अन्नपूर्णाकक्षात पू. रेखाताई आणि सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) बोलत असतांना त्यांना पाहून ‘पू. रेखाताई श्रीरामाच्या रूपात आणि सौ. सुप्रिया माथूर मारुतीच्या रूपात आहेत’, असे मला जाणवले.’

– श्रीमती अनिता भोसले, कराड, जिल्हा सातारा. (१७.६.२०२२)   

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक