देशात मुसलमानांकडून ‘लव्ह जिहाद’ केला जात आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

नवी देहली – देहलीमध्ये श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीची नृशंसपणे हत्या केली गेली, तसेच तिच्या शरीराचे तुकडे केले गेले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. देशातील मुसलमानांकडून ‘लव्ह जिहाद’ केला जात आहे. कट रचून मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर त्यांना सोडून देतात किंवा तिचे तुकडे तुकडे करून हत्या करतात, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली.

आफताब याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर दुसर्‍या तरुणीला बोलावले होते घरी !

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहाणार्‍या श्रद्धा वालकर हिची हत्या करणार्‍या आफताब पूनावाला याला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती देत आहे. श्रद्धाला भेटल्यानंतर आफताबने ‘बंबल’ हे ‘डेटींग अ‍ॅप’ भ्रमणभाषमधून पुसून (डिलीट) टाकले होते, ते त्याने तिच्या हत्येनंतर पुन्हा भ्रमणभाषमध्ये ‘डाऊनलोड’ केले होते. त्याद्वारे त्याची एका तरुणीशी ओळख झाली होती आणि ही तरुणी त्याच्या घरीसुद्धा येऊन गेली होती, अशी माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात कळाली आहे.

संपादकीय भूमिका

गिरिराज सिंह यांनी लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी त्यांच्या सरकारला सांगून देशात याविरोधात कठोर कायदा करून दोषींना फाशीची शिक्षा होण्यासाठीची तरतूद त्यात केली पाहिजे !