इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन करणार्‍याला फाशी शिक्षा

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

तेहरान (इराण) – इराणमध्ये सध्या चालू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाच्या प्रकरणी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा, तसेच अन्य ५ जणांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोषींवर सरकारी इमारतींना आग लावण्याचा, दंगली भडकवण्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध कट रचल्याचा आरोप आहे. ज्यांना शिक्षा झालेली आहे, ते सर्व जण वरच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतात. सप्टेंबरमध्ये निदर्शने चालू झाल्यापासून तेहरानमध्ये २ सहस्रांहून अधिक लोकांना आरोपी घोषित करण्यात आलेले आहे.