जेकोकाबाद (पाकिस्तान) येथील हिंदु तरुण अशोक कुमारला  स्वीकारावा लागला इस्लाम !

पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंची दैनावस्था !

जेकोकाबाद (पाकिस्तान) – ‘येथील सिजावल गावातील सर्वांत तरुण हिंदु अशोक कुमार याला इस्लाम धर्म स्वीकारण्यास बाध्य करण्यात आले. येथील वाळीत टाकण्यात आलेल्या अल्पसंख्यांकांकडे दुसरा पर्यायही नाही. एकतर त्यांना या देशातून स्थलांतरित व्हावे लागते अथवा इस्लाम धर्म स्वीकारावा लागतो. त्याखेरीज ते येथे शांततेत राहू शकत नाहीत’, असे ट्वीट ‘हिंदूज ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’चे संस्थापक आणि मुख्य संघटक नारायण दास भील यांनी केले.