३ मुसलमानांना अटक !
जोधपूर (राजस्थान) – येथील सूरसागर परिसरात असलेल्या पाण्याच्या सरकारी पंपातून पाणी घेतल्याने धर्मांध मुसलमानांनी किशनलाल भील नावाच्या एका मागासवर्गीय व्यक्तीला अमानुष मारहाण केली. किशनलाल यांच्या कुटुंबियांनी त्यांना घायाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधांनी त्यांना रोखले. पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर किशनलाल यांना रुग्णालयात नेता आले; परंतु उपचारांच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी शकील, नासिर आणि बबलू या तिघांना अटक केली आहे. अन्य मारेकरी फरार आहेत.
Hindu ST man Kishanlal Bheel lynched to death by Shakeel and others over drawing of water in Jodhpur, Rajasthan https://t.co/lLXaSQz1fj
— HinduPost (@hindupost) November 8, 2022
१. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सूरसागर पोलीस ठाण्याच्या सीमेतील एका गावात किशनलाल यांनी सरकारी पंपातून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथील धर्मांध मुसलमानांनी किशनलाल यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर आक्रमण केले. हा पंप शकील, नासिर आणि बबलू यांनी बळकावल्याचा आरोप किशनलाल यांच्या भावाने केला आहे.
२. किशनलाल यांच्या कुटुंबियांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासह कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि ५० लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याची मागणी केली . यासाठी त्यांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलनही केले.
३. या घटनेवर दलित नेते अनिल तेजी म्हणाले की, ‘मीम और भीम भाई-भाई’ अशी घोषणा देणार्या ‘मीम’पैकी (मुसलमानांपैकी) कुणीच धरणे आंदोलनाला का आले नाही ?
संपादकीय भूमिका
|