
‘५.११.२०२२ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ ५ वर प्रसिद्ध झालेल्या ‘धर्मानुसार आचरण केल्याने…’ या लेखासंबंधी अनेक वाचकांनी पुढील प्रश्न विचारला. लेखातील सूत्र ‘५’ मधील उपसूत्र ‘उ’ यामध्ये ‘ग्रहणाच्या पर्वकाळात, म्हणजे ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून सायंकाळी ६.१९ वाजेपर्यंत, म्हणजे ग्रहण संपेपर्यंत पाणीही पिऊ नये,’ असे दिले आहे. तेथे ‘८ ऐवजी ७ नोव्हेंबर असे हवे का ?’, असे विचारले. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. ‘ग्रहणाचे वेध सूर्योदयापासून पाळावेत. वेधकाळात विनाअन्न उपवास करत असतांना पाणी प्यायल्यास चालते. ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे साधारण २० मिनिटांच्या काळात मात्र पाणीही पिऊ नये. त्यामुळे लेखात दिलेले सूत्र योग्य आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२)
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे