कोल्हापूर येथे १६ वर्षीय हिंदु मुलीला पळवून नेणार्‍या अमीर मुजावर यास अटक

कोल्हापूर – जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झालेली घटना ताजी असतांनाचा राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या सीमेतही ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघडकीस आला. येथेही १६ वर्षांच्या एका हिंदु तरुणीला पळवून नेणार्‍या अमीर मुजावर या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. अमीरला न्यायालयात उपस्थित केले असता, त्याला ४ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या संदर्भात १५ ऑक्टोबरला राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरात गेल्या काही मासांपासून हिंदु युवतींना मुसलमान युवकांकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तसेच फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. या संदर्भात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन २ नोव्हेंबरला या संदर्भात ‘धरणे आंदोलन’ करून या प्रकरणांना वाचा फोडली होती.