सौ. मधुवंती चारुदत्त पिंगळे यांची स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी झालेली विचारप्रक्रिया !

‘काही वर्षांपूर्वी माझी आध्यात्मिक पातळी न्यून झाली. त्यानंतर माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मकता निर्माण होऊन माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला. या वर्षी ‘आत्मोन्नतीदर्शक आढावा’ याविषयीची सूचना वाचल्यावर परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.

सौ. मधुवंती पिंगळे

१. ‘आत्मोन्नती, म्हणजे स्वतःमधील परात्पर गुरुदेवांचे तत्त्व जे अंशरूपाने आहे, ते विकसित झाले का ? आत्म्याची परमात्म्याच्या दिशेने वाटचाल झाली का ?’, हे पहाणे.

२. परात्पर गुरुदेव आणि माझ्यात असलेल्या ‘माझे संचित, प्रारब्ध आणि स्वभावदोष अन् अहं’ या चार पडद्यांविषयी आत्मपरीक्षण करणे

अ. ‘माझी आध्यात्मिक पातळी किती आहे ?’, याचा विचार करण्यापेक्षा ‘गुरुदेव आणि माझ्यात ‘माझे संचित, प्रारब्ध आणि माझ्यातील स्वभावदोष अन् अहं’ यांचे जे चार पडदे आहेत, ते किती प्रमाणात अल्प झाले ?’, याचे आत्मपरीक्षण मी करायला हवे.

आ. ‘माझे संचित आणि प्रारब्ध यांचे गाठोडे केवढे आहे ?’, याविषयी मी जाणूच शकत नाही. ते केवळ परात्पर गुरुदेवांनाच ज्ञात आहे. मी साधनेत येण्यापूर्वी आणि साधनेत आल्यापासून परात्पर गुरुदेवांनी माझे प्रारब्ध सुसह्य करून संचित न्यून केले आहे’, हे सर्व आठवून माझी परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

३. परात्पर गुरुदेवांची महानता जाणणे

माझे गुरुदेव एवढे महान आहेत की, त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सांगून आजपर्यंत अनेक साधकजिवांमध्ये आमूलाग्र पालट केले आहेत. त्यांच्या कृपेने अनेक साधकजिवांची मने शुद्ध आणि निर्मळ झाली आहेत.

४. परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले अष्टांग साधनेचे टप्पे आचरणात आणण्यासाठी तळमळीने प्रयत्न करून प्रयत्नांमधील आनंद घ्यायचा असणे आणि ‘प्रयत्न करण्यात कुठे न्यून पडले ?’, याचे अंतर्मुखतेने निरीक्षण करायचे असणे

‘मला केवळ परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले अष्टांग साधनेचे टप्पे आचरणात आणण्याचे प्रयत्न निरपेक्षतेने आणि सातत्याने करून प्रयत्नांमधील आनंद घ्यायचा आहे. ‘त्यांनी सांगितलेले प्रयत्न करण्यात मी गेल्या वर्षभरात कुठे न्यून पडले ? आणि ‘पुढे मला काय प्रयत्न करायचे आहेत ?’, हे निश्चित करून त्यांना अपेक्षित असे मला घडायचे आहे. ‘माझ्यात ईश्वरी गुण विकसित झाले आहेत का ?’, याचा मी अभ्यास करायला हवा. केवळ वर्षाच्या शेवटी (गुरुपौर्णिमेच्या दिवशी) हा आढावा न घेता ‘प्रतिदिनच माझी आत्मोन्नती झाली का ?’, याचा मी अंतर्मुखतेने अभ्यास करायला हवा. परात्पर गुरुदेव माझी आध्यात्मिक उन्नती करून घेणारच आहेत.’ (अष्टांग साधनेचे टप्पे : १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम))

५. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे सुचलेल्या या विचारांमुळे मी आनंदी झाले.

६. कृतज्ञता आणि प्रार्थना

केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि सौ. सुप्रिया माथूर (आताची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगांमुळे माझ्यात पालट झाला.

‘गुरुदेव, आपण मला ‘निरपेक्षतेने प्रयत्न कसे करायचे ? अंतर्मुखता कशी वाढवायची ? आणि प्रयत्नांमधील आनंद कसा घ्यायचा ?’, हे शिकवा’, अशी मी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– गुरुचरणी,

सौ. मधुवंती पिंगळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२१)