सांगली – ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’च्या वतीने रविवार, ३० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता दैवेज्ञ भवन येथे शिवभक्तांच्या मागणी परिदषेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफझलखान वधाची शिवप्रतापाची जागा जनतेला पहाण्यासाठी येत्या शिवप्रतापदिनापूर्वी सरकारने तात्काळ खुली करावी. अफझलखान आणि सय्यद बंडा यांच्या नावावर असलेल्या वनखात्याच्या जागेवरील अवैध बांधकाम सरकारने तात्काळ काढून टाकावे, तसेच अफझलखान वधाच्या जागेसमोर शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभे करावे, अशा मागण्या प्रामुख्याने या परिषदेत करण्यात येणार आहेत. या मागणी परिषदेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे पक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती अशा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व शिवभक्त आणि राष्ट्रभक्त यांनी या परिषदेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक श्री. नितीन शिंदे यांनी केले आहे.