कधी काय म्हणायचे, हेही न कळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ !

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणभाष केल्यावर ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात. त्यामुळे मी ‘वन्दे मातरम्’ न म्हणता ‘जय महाराष्ट्र’ म्हणीन. कायद्याने अशी बंधने घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी-निवडीनुसार ते बोलतात’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी राज्यशासनाने सरकारी कार्यालयांत दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याच्या केलेल्या नियमावर केले.’