पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

पी.एफ्.आय. वरील कारवाईचे प्रकरण

पुणे – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी येथील मुसलमान समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे नियोजन केले होते; मात्र हे आंदोलन चालू होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना कह्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रहित करण्यात आले. यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या काही आंदोलकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘नारा-ए-तकबीर (अल्ला सर्वांत मोठा आहे), अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे)च्या घोषणा दिल्या. या वेळेस आंदोलकांनी ‘आर्.एस्.एस्. मुर्दाबाद’ अशाही घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि पी.एफ्.आय.च्या ६० ते ७० कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी अन्य काही व्यक्तींनाही कह्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

संपादकीय भूमिका

राष्ट्रघातकी जिहादी संघटना पी.एफ्.आय.चे समर्थन करून देशद्रोही घोषणाबाजी करणार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा करणे आवश्यक !