अमेरिकेत वर्ष २०२० मध्ये सर्वाधिक ५०० टक्के वाढ !
न्यूयॉर्क (अमेरिका) – संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.
या संस्थेचे सहसंस्थापक जोएल फिंकेलस्टाइन म्हणाले, ‘‘हिंदूंच्या विरोधात पोस्ट्स सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात येत आहेत. अमेरिकेत गेल्या काही मासांत हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांतही वाढ झाली आहे. कॅनडातही अशा घटना वाढल्या आहेत. इंग्लंडमध्येही जाणीवपूर्वक आक्रमणे केली जात आहेत. अमेरिकेत वर्ष २०२० मध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांवरील आक्रमणांत ५०० टक्यांनी वाढ झाली आहे.’’
दुनिया भर में हिंदुओं पर हमलों की घटनाएं बढ़ी: नफरत के मामलों में भी लगातार इजाफा; अमेरिकी रिसर्च में खुलासा- हिंदुओं के खिलाफ नफरत और हिंसा के केस 1000% बढ़ेhttps://t.co/stcTOSCjxz#Hinduism #International
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) September 24, 2022
ब्रिटनमध्ये पाकिस्तानी जिहादी टोळींकडून होतात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे !
ब्रिटीश अन्वेषण संस्थेच्या म्हणण्यानुसार वर्ष २०२० मध्ये ब्रिटनच्या लिसेस्टर आणि बर्मिंगहॅमच्या स्मॅडॅक येथे अलीकडे मंदिरांवर झालेल्या आक्रमणांत पाकिस्तानी जिहादी टोळीचा हात असल्याचे उघड झाले. पाकिस्तानातील आतंकवादी संघटना ब्रिटनमध्ये जिहाद पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत. आतंकवाद्यांना ब्रिटनच्या आश्रयगृहांमध्ये ठेवले जाते. ही आश्रयगृहे मुसलमानांच्या मदरशांतून लपूनछपून चालवली जातात. एडिनबरामध्ये गेल्या काही दिवसांत अशा ठिकाणी टाकलेल्या धाडींमधून काही संशयितांना अटक करण्यात आली होती.
ब्रिटनमध्ये अल्पसंख्य मुसलमान कारागृहात मात्र बहुसंख्य !
ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आलेल्या एका अहवालानुसार ब्रिटनच्या सुमारे ७ कोटींहून अधिक असणार्या लोकसंख्येपैकी ४ टक्के मुसलमान आहेत. मुसलमानांमध्ये गुन्हेगारीतील प्रमाण अधिक आहे. ब्रिटनच्या कारागृहांतील बंदीवानांपैकी १८ टक्के मुसलमान आहेत. त्यानुसार इंग्लंड आणि वेल्स येथील एकूण लोकसंख्येत २ टक्के हिंदू आहेत; परंतु कोणताही हिंदू मोठ्या गुन्ह्यासाठी अटकेत नाहीत.
ब्रिटनमध्ये १४ लाख हिंदू, तर ११ लाख पाकिस्तानी मुसलमान !
ब्रिटनमध्ये सुमारे १४ लाखांहून अधिक हिंदू आहेत, तर सुमारे ११ लाख पाकिस्तानी मुसलमान आहेत. ब्रिटनमध्ये मुसलमानांची लोकसंख्या एकूण २८ लाखांवर आहे. त्यात अफगाणिस्तान, इराक, सीरिया, मोरक्को आणि अल्जेरिया या देशांतील मुसलमान आहेत. पाकिस्तान जिहादी टोळी त्यांपैकी काही मुसलमानांच्या साहाय्याने मंदिरांवर आक्रमणे करतात.
संपादकीय भूमिका
|