बांगलादेशात आतंकवाद्यांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

बांगलादेशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

कुष्टिया (बांगलादेश) – बांगलादेशातील कुष्टिया जिल्ह्यामधील लाहिनी कर्माकर गावात आतंकवाद्यांनी नुकतीच दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. नवरात्रोत्सवातील दुर्गापूजेच्या पूर्वी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवर झालेले हे तिसरे आक्रमण आहे.

‘हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा करू न देण्याचा आतंकवाद्यांचा डाव आहे. हिंदूंवरील हा अत्याचार थांबला पाहिजे. या संदर्भात सरकारने जलद कारवाई करावी’, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने केली आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक