‘ऋग्वेद मांसाहार करण्याची अनुमती देतो’, असे म्हणणारा जम्मूमधील मुसलमान अधिकारी निलंबित

राजौरी (जम्मू-कश्मीर) – हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी येथील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अब्दुल राशिद कोहली याला निलंबित करण्यात आले आहे. दुपारी कनिष्ठ सहकार्‍यांसमवेत अब्दुल राशिद कोहली जेवत असतांना सहकार्‍यांना उद्देशून ‘ऋग्वेद मांसाहाराची अनुमतो देतो’ असे विधान केले होते. त्यावरून त्याला निलंबित करण्यात आले आहे. ज्यांच्या समोर कोहली यांनी हे विधान केले होते, त्या ४ ग्रामसेवकांपैकी एका ग्रामसेवकाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

१. निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, या अधिकार्‍याच्या विधानामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्याने सेवा वर्तनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

२. अब्दुल राशिद याने याविषयी सांगितले, ‘मी ४ ग्रामसेवकांसह एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. यांतील २ जण मुसलमान होते आणि २ जण हिंदू होते. यातल्या एकाने शाकाहारी जेवण मागवले आणि उर्वरित ग्रामसेवकांनी मांसाहारी जेवण मागवले. ाची जेवत असतांना ‘ऋग्वेद मांसाहाराची अनुमती देतो अथवा नाही’, यावर चर्चा चालू झाली. मी इंटरनेटवर वाचले होते की, ऋग्वेद मांसाहारी जेवणाची अनुमती देतो. (इंटरनेटवर अब्दुल राशिद यांच्या धर्माविषयी बरेच काही लिहिलेले आहे, त्याविषयी ते का बोलत नाहीत ? – संपादक) माझ्या या विधानामुळे हिंदु ग्रामसेवकाला वाईट वाटेल, असे मला वाटले नव्हते. त्यांनी वाईट वाटल्याचे तिथेच सांगितले असते, तर मी क्षमा मागितली असती. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता आणि मी त्यांना मांसाहाराची सक्तीही केली नव्हती. (अब्दुल राशिद याचा साळसूदपणा ! हिंदु सहिष्णु असल्याने त्यांनी वैध मार्गाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला. जर याउलट असते आणि एखाद्या हिंदूने अशा प्रकारचे विधान राशिद यांच्याविषयी केले असते, तर काय झाले असते, याची कल्पना करता येत नाही ! – संपादक)

इस्लाम स्वीकारण्यास दबाव

अब्दुल राशिद तेथील हिंदु सहकार्‍याला मांसाहार करण्यासाठी दबाव निर्माण करत होता. ‘तू जर गोमांस खाशील, तर पवित्र होशील’, असेही त्याने म्हटले. या सहकार्‍याने आरोप केला आहे की, त्याचे मुसलमान सहकारी त्याला इस्लाम स्वीकारण्यासही दबाव निर्माण करत होते. या वेळी विरोध केल्यावर नोकरीच्या ठिकाणी त्रास देण्याची धमकीही त्यांनी दिली. (‘असे सरकारी अधिकारी जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य करत असणार’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? अशांमुळेच काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपुष्टात येत नाही. जिहाद हेच यामागील मुख्य कारण आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

 हिंदूंच्या धर्मग्रंथांत काय म्हटले आहे, यापेक्षा या अधिकार्‍याने त्याच्या धर्मग्रंथांत काय म्हटले आहे आणि ते प्रत्यक्षात काय करत आहेत, याविषयी बोलायला हवे !