बांगलादेशात मंदिरावर आक्रमण करून श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची तोडफोड

मदरशातील ३ विद्यार्थ्यांना अटक

प्रतीकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – बांग्लादेशातील केनमारी मंदिरातील श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची मदरशातील ३ मुसलमान विद्यार्थ्यांकडून तोडफोड करण्यात आली. या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मंदिरालगतच्या मैदानावर फुटबॉल खेळण्यास मंदिर समितीकडून मज्जाव करण्यात आल्याने त्यांनी ही तोडफोड केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी धडा शिकवण्याची धमकीही दिली होती.

संपादकीय भूमिका

मदरशातील विद्यार्थी काय शिकतात ? आणि त्यानंतर ते काय करतात ?, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते ! या घटनेविषयी भारत सरकार बांगलादेशला जाब कधी विचारणार ?