प्रियांका गोस्वामी यांनी पदकाचे श्रेय दिले भगवान श्रीकृष्णाला !

बर्मिंघम (ब्रिटन) येथे चालू असलेली राष्ट्रकुल स्पर्धा

प्रियांका लड्डू गोपाळाच्या मूर्तीसमवेत

बर्मिंघम (ब्रिटन) – येथे चालू असलेल्या ‘राष्ट्रकुल स्पर्धे’मध्ये भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामी यांनी १० सहस्र मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळवले. प्रियांका गोस्वामी यांनी, ‘मी माझ्या यशाचे श्रेय भगवान श्रीकृष्ण आणि माझे कुटुंब यांना देत आहे. त्यांच्याखेरीज मी हे यश प्राप्त करू शकले नसते’, असे म्हटले आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमानंतर प्रियांका या लड्डू गोपाळाच्या मूर्तीसमवेत असल्याचे दिसून आले.

मूळच्या उत्तरप्रदेशातील मेरठच्या प्रियांका गोस्वामी या रेल्वे कर्मचारी आहेत. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांचे वडील मदनपाल गोस्वामी आधी बसवाहक होते. पुढे त्यांची नोकरी गेल्यावर त्यांनी टॅक्सीचालक म्हणून काम करून उदरनिर्वाह चालवत प्रियांका यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

  • किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?
  • हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या कुणा पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी अथवा साम्यवादी यांनी प्रियांका गोस्वामी यांना आता विरोध केल्यास आश्‍चर्य वाटू नये !