तमिळनाडूमधील ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश न करण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश !

तमिळनाडू अनुसूचित जाती-जमाती आयोग संतप्त

तिरुपथुर (तमिळनाडू) – तमिळनाडूमधील अंबुर येथे आयोजित ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा (‘बीफ बिर्याणी’चा) समावेश न करण्याचा आदेश तिरुपथुरच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे तमिळनाडू अनुसूचित जाती-जमाती आयोगाने संतात व्यक्त केला आहे. सरकारी कार्यक्रमात ‘बीफ बिर्याणी’चा समावेश न करणे, म्हणजे भेदभाव असल्याचे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने तिरुपथुरचे जिल्हाधिकारी अमर कुशवाहा यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

हा ‘खाद्य उत्सव’ मे मासामध्ये आयोजित करण्यात येणार होता; मात्र याविषयी वाद निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने पावसाच्या अंदाजाचे कारण देत कार्यक्रम पुढे ढकलला होता.

संपादकीय भूमिका

गोमाता ही हिंदूंसाठी पूजनीय आहे. सरकारी ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश करणे, म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय !