संभाजीनगर येथील सौ. सीमंतिनी बोर्डे यांना शास्त्रीय गायनाचा सराव करतांना आणि गायनाची शिकवणी घेतांना विविध राग अन् ताल यांची जाणवलेली वैशिष्ट्ये !

संभाजीनगर येथील सौ. सीमंतिनी बोर्डे यांनी संगीतात ‘एम्.ए.’पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी गांधर्व महाविद्यालयातर्फे शास्त्रीय संगीतात ‘संगीत अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. गेल्या ३२ वर्षांपासून त्या गायनाच्या शिकवण्या घेत आहेत. त्यांनी सुगम संगीत मान्यता प्राप्त कलाकार म्हणून आकाशवाणीवर गायन केले आहे. त्या नियमितपणे एक घंटा गायनाचा सराव करतात. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून केल्या जाणाऱ्या संगीतातील संशोधनाच्या सेवेतही त्या सहभागी असतात. त्यांना गायनाचा सराव करतांना आणि गायनाची शिकवणी घेतांना विविध रागांचे जाणवलेले तत्त्व, विविध रागांचा जाणवलेला रंग, विविध रागांविषयी जाणवलेली वैशिष्ट्ये अन् त्या समवेतच विविध तालांचे लक्षात आलेले गुणधर्म या लेखात दिले आहेत.

१. गायनाचा सराव करतांना रागांची जाणवलेली वैशिष्ट्ये

सौ. सिमंतिनी बोर्डे

२. गायनाचे शिकवणीवर्ग घेतांना रागांची जाणवलेली वैशिष्ट्ये

टीप १ – तीव्र स्वर : जो स्वर आपली मूळ जागा सोडून अधिक उंचीवर जातो; परंतु पुढील स्वरापेक्षा अल्प उंचीवर असतो, त्याला ‘तीव्र स्वर’, असे म्हणतात. तीव्र मध्यम स्वरात ‘म’ हा स्वर तीव्र असतो.

टीप २ – मंद्र सप्तक : गायन-वादनात प्रचलित असलेल्या तीन सप्तकांतील हे पहिले सप्तक आहे. मंद्र सप्तकातील स्वर गातांना निघणारा नाद हा शरिराच्या नाभीस्थानातून उत्पन्न झालेला असतो.

टीप ३ – कोमल स्वर : जो स्वर आपली मूळ जागा सोडून खालच्या कंपनस्थितीला येतो; परंतु मागील स्वरापेक्षा अधिक कंपनसंख्येला असतो, त्यांना ‘कोमल स्वर’, असे म्हणतात. कोमल स्वराची खूण म्हणजे स्वर आणि त्या खाली रेघ अशी असते, उदा. रे

३. तालाचे लक्षात आलेले गुणधर्म

(‘साधकाची आध्यात्मिक पातळी, राग गातांना किंवा ऐकतांना असलेली त्याची भावस्थिती आणि मनःस्थिती यांवर त्याला येणाऱ्या अनुभूती अवलंबून असतात. आध्यात्मिक पातळी वाढल्यावर सूक्ष्मातील योग्य प्रकारे जाणवायला लागते आणि सूक्ष्मातील उत्तरे बरोबर येतात. या दृष्टीने सदर अनुभूती साधिकेच्या भावापरत्वे आहेत.’ – संकलक)

– सौ. सीमंतिनी बोर्डे, संगीत अलंकार, संभाजीनगर. (२७.११.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक