नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) – येथील मुसलमानबहुल ‘महाजनी टोला’ या ठिकाणी हिंदूंच्या घरांवर जिहाद्यांकडून दगडफेक करण्यात येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हिंदूंचे म्हणणे आहे की, या भागात हिंदूंची संख्या अल्प आहे. यामुळेच जिहादी मुसलमान आम्हाला त्रास देत आहेत जेणेकडून आम्ही येथून पलायन करण्यास बाध्य होऊ.

येथे रहाणारे इमरत प्रजापती यांच्या घरावर दगडफेक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळाने पोलीस आले आणि ते पहाणी करून गेले. त्यानंतर काही वेळाने परत त्यांच्या घरावर दगडफेक चालू झाली. या प्रकरणी प्रजापती यांनी सांगितले, ‘आम्ही प्रशासनाकडे येथे गस्त घालण्याची मागणी केली आहे. या दगडफेकीच्या घटनांमुळे आतापर्यंत २-३ हिंदु कुटुंबे घर विकून येथून दुसरीकडे निघून गेली आहेत.’

संपादकीय भूमिका

  • ‘मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
  • जेथे हिंदू अल्पसंख्य असतात तेथे त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते, हे निधर्मीवादी हिंदूंना कधी कळणार ?