असे आहेत आमचे परात्पर गुरु डॉ. आठवले !

असे आहेत आमचे परात्पर गुरु डॉ. आठवले !

Such is Our Param Pujya !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

एस्.एस्.आर्.एफ.चे संत पू. देयान ग्लेश्चिच परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी लिहिलेली कृतज्ञतापर कविता येथे त्यांच्याच शब्दांत इंग्रजीत, तर सर्व वाचकांना कळावी यासाठी त्याचा मराठीत अर्थ येथे देत आहोत.

पू. देयान ग्लेश्‍चिच

Whatever the amount of distress ।
The seeker keeps progressing still ।
Such is the love of our Param Pujya (Note) ।। 1 ।।

असो कितीही तीव्र त्रास ।
करवून घेती साधकांची आध्यात्मिक प्रगती ।
प्रीती अशी आहे आमच्या परात्पर गुरुदेवांची (टीप) ।। १ ।।

However large personality defects or ego we have ।
They are reduced and removed ।
Such is the ability of our Param Pujya ।। 2 ।।

कितीही असोत आमच्यात तीव्र स्वभावदोष किंवा अहं ।
तरीही ते होतील न्यून आणि नष्ट ।
क्षमता अशी आहे आमच्या परात्पर गुरुदेवांची ।। २ ।।

Whatever the amount of destiny one has ।
It is nullified or overcome ।
Such is the grace of our Param Pujya ।। 3 ।।

असो प्रारब्ध आमचे कितीही घोर ।
होते त्याची तीव्रता न्यून अथवा नष्ट ।
आहे अशी कृपा आमच्या परात्पर गुरुदेवांची ।। ३ ।।

Whichever question anyone asks ।
The answer is given in many ways ।
Such is the knowledge of our Param Pujya ।। 4 ।।

विचारू देत एखाद्याने कोणताही प्रश्न ।
देतात त्यांची विविध मार्गांनी उत्तरे ।
आहे असे ज्ञान आमच्या परात्पर गुरुदेवांचे ।। ४ ।।

In whichever place on earth or
subtle world a seeker yearns ।
He is found and taken ahead ।
Such is the vastness of our Param Pujya ।। 5 ।।

असो साधक पृथ्वीवर अथवा कोणत्याही सूक्ष्म जगतात ।
शोधूनी त्याला घेऊन जातात साधनेत पुढे ।
आहे अशी व्यापकता आमच्या परात्पर गुरुदेवांची ।। ५ ।।

Whatever amount of impurity
and pollution exists ।
Chaitanya spreads and purity prevails ।
Such is the radiance of our Param Pujya ।। 6 ।।

कितीही असो प्रदूषण आणि असात्त्विकता ।
सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित करून करते वातावरणाची शुद्धता ।
अशी आहे आमच्या परात्पर गुरुदेवांची तेजोमय आभा ।। ६ ।।

However much unrigtheousness has taken root in all corners of the world,
Divine Kingdom is on the way,
Such is the power of our Param Pujya ।। 7 ।।

जगात अधर्माचरणाने गाठला आहे कळस ।
ईश्वरी राज्याच्या स्थापनेलाही झाला आहे आरंभ ।
असे आहे सामर्थ्य आमच्या परात्पर गुरुदेवांचे ।। ७ ।।

टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले

Note – Paratpar Guru Dr. Athavale

परात्पर गुरु डॉक्टरांच्या पावन चरणी कृतज्ञापूर्वक अर्पण !’

– (पू.) देयान ग्लेश्चिच, युरोप (४.११.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक