वास्को येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

वास्को, २८ मे (वार्ता.) – एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी वास्को पोलिसांनी पीडितेच्या आत्याचा पती संशयित नसीम महंमद याला कह्यात घेतले. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीवर वास्को येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. संशयित नसीम महंमद याने पीडितेचे अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ‘गोवा बाल कायदा’, ‘पॉक्सो’ आणि भारतीय दंडसंहितेचे कलम ३७६ (३) अंतर्गत गुन्हा नोंदवून संशयित नसीम महंमद याला कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका 

अशांवर कठोरातील कठोर कारवाईच व्हायला पाहिजे !