(म्हणे) ‘या देशाचे हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही !’ – निखिल वागळे, माजी पत्रकार

निखिल वागळे

सातारा, १२ मे (वार्ता.) – आज देशात प्रतिदिन फाळणी होतांना दिसत आहे. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रतिदिन द्वेषाची पेरणी केली जात आहे. हे माध्यमांनीच थांबवायला हवे; मात्र आजचे पत्रकार विदूषक झाले आहेत. दोष माध्यमांचा नाही. माध्यमांतून काम करणारे माझ्यासारखे सरपटणारे प्राणी झाले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट दाखवून द्वेष पसरवला जात आहे. त्याला मी विरोध केला. (काश्मिरी हिंदूंवरील अन्याय वागळे यांना अयोग्य न वाटता योग्य वाटतो, असाच याचा अर्थ होत नाही का ? म्हणजे वागळे यांना हिंदूंपेक्षा आतंकवादी जवळचे वाटतात, असे नव्हे का ? अशांनी भारतात कशाला रहायचे, असे भारतियांना वाटले, तर चूक ते काय ? – संपादक) काहीही झाले तरी या देशाचे हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पत्रकार निखिल वागळे यांनी केले.

जकातवाडी (जिल्हा सातारा) येथील शारदाबाई पवार आश्रमशाळा येथे ‘शाहू-फुले-आंबेडकर’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते वागळे यांना प्रदान करण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • कुणाच्या म्हणण्याने किंवा न म्हणण्याने हिंदु राष्ट्र येणार किंवा यायचे थांबणार असे नाही. जसे सूर्य उगवणे हा निसर्गाचा नियम आहे, त्याप्रमाणे अधर्माच्या अतिरेकानंतर धर्मराज्याची स्थापना हा काळाचा नियम आहे. त्यामुळे वागळे यांच्यासारख्या हिंदुद्वेषी पत्रकारांनी कितीही आरडाओरडा केला तरी हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्याविना रहाणार नाही.
  • कालगतीनुसार सध्या घडत असलेल्या घटना पहाता ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेची नांदी आहे, असे अनेकांना वाटत आहे. हिंदूंचे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे आरंभ होईल, असे कुणाला कधी वाटले होते का ? पण देशात सर्वत्र ते चालू झाले आहे. त्यामुळे ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, हे वागळे यांनी ध्यानात घ्यावे. 
  • हा देश प्राचीन काळापासून हिंदु राष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांशी लढून ‘हिंदवी स्वराज्या’चीच स्थापना केली होती. इंदिरा गांधी यांनी ‘निधर्मी’ हा शब्द राज्यघटनेत नंतरच्या काळात घुसवला असला तरी तो काढणेही अवघड नाही !

 

(म्हणे) ‘धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार

या वेळी खासदार शरद पवार म्हणाले की, आज देशातील तळागाळातील माणसाला काय अपेक्षित आहे, ते मिळत नाही. जातीजातींत भांडणे लावली जात आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. जातीवाद उफाळून आणला जातोय, संघर्षाचा विस्तव फुलवला जातोय. यामध्ये सामान्य माणूस भरडला जातोय. शाहूंसारखा राजा आणि फूलेंसारखा विचारवंत यांची देशाला आवश्यकता आहे. डॉ. आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. माणसाला त्याचे मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत, असे संविधानात लिहून ठेवले आहे. यांच्या नावाने लक्ष्मण माने यांनी पुरस्कार चालू केला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, हे ब्रीदवाक्य येथे लागू पडते. या ठिकाणी (लक्ष्मण माने यांच्या आश्रमशाळेत) ब्रह्मा, विष्णु आणि महेश घडवण्याचे काम केले जाते.

संपादकीय भूमिका

ओवैसी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करतात, तेव्हा शरद पवार यांना धार्मिक तेढ निर्माण होते असे वाटत नाही, रझा अकादमी दंगल करते, तेव्हा पवार यांना धार्मिक तेढ निर्माण होते असे वाटत नाही, हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे होतात, तेव्हा धार्मिक तेढ निर्माण होते, असे पवार यांना वाटत नाही. अर्थात् मुंबईत बाँबस्फोट झाल्यावर जाणूनबुजून मुसलमानांच्या वस्तीतही बाँबस्फोट झाल्याची आवई उठवणाऱ्या शरद पवारांकडून दुसरी काय अपेक्षा करणार ?