लांजा (रत्नागिरी) – तालुक्यामध्ये सकाळी अजानच्या वेळी भोंग्याचा वापर न करण्याचा, तसेच भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय तालुक्यातील मुसलमानांनी घेतला आहे. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे आणि तालुक्यातील मुसलमान यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ही बैठक सय्यद चांदशहा मुखारी दर्गा येथे पार पडली. या वेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, जमातुल मुस्लिमीन लांजाचे अध्यक्ष शौकत नाईक, दिलीप मुजावर, मशीद आणि मदरसा यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह मौलवी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे म्हणाले, ‘‘सर्वांनी कायद्याचे पालन करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन जे करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे.’’
या वेळी लांजा तालुक्यातील २७ मशीद आणि मदरसा यांना सकाळी ६ ते रात्री १० अजानसाठी ध्वनीक्षेपक परवाना देण्यात आला. (म्हणजे या मशिदींमध्ये आतापर्यंत अनधिकृतपणे भोंग्यांचा वापर केला जात होता, हेच लक्षात येते ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|