दारी गुढी उभी राहिली ।
हिंदु राष्ट्राची पहाट जवळ आली ।। १ ।।
गुढी आंब्या-कडुनिंबाच्या डहाळ्यांनी सजली ।
हिंदु राष्ट्राची पहाट जवळ आली ।। २ ।।
गुढी भरजरी वस्त्राने नटली ।
हिंदु राष्ट्राची पहाट जवळ आली ।। ३ ।।
वर कलश शोभतो लय भारी ।
त्यातून अखंड चैतन्य पाझरे झरझरी ।
हिंदु राष्ट्राची शपथ घेऊया या शुभदिनी ।
हा संकल्प सिद्ध करण्या, आहे समर्थ माझ्या गुरूंची वाणी ।। ४ ।।
हिंदु राष्ट्राचा संकल्प सिद्ध करूया ।
यासाठी तन-मन-धन, प्रसंगी सर्वस्व अर्पूया ।। ५ ।।
हिंदु राष्ट्र ही समष्टी साधना ।
त्यासाठी आजच्या शुभदिनी ।
व्यष्टी साधनेची विस्कटलेली घडी बसवण्याचा संकल्प ।
ब्रह्मध्वजाच्या चरणी म्हणजेच गुरुचरणांवरी सोडूया ।। ६ ।।
या द्वारे या मर्त्य जिवाचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी ।
सतत अविरतपणे धडपडूया ।। ७ ।।
माझे कथन हे आत्मनिवेदन स्वरूपी ।
गुरुचरणी शरणागतभावाने वहातो ।
माझी व्यष्टी साधना नियमितपणे पूर्ण करून घ्यावी ।
ही आर्त प्रार्थना आपुल्या चरणी करतो ।। ८ ।।
माझे गुरु प्रसन्नपणे हसले ।
माझे मूक रूदन त्यांना सूक्ष्मातून कळले ।
संकल्प झाला गुरुदेवांचा, व्यष्टी साधनेची घडी बसण्याविषयी ।
मी निश्चिंत झालो आता ।। ९ ।।
– श्री. संजय गोपाळ घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (१३.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |