‘लव्ह जिहाद’वर आधारित ‘द कन्वर्झन’ या हिंदी चित्रपटाचे अमेरिकेत ‘स्क्रीनिंग’ !

  • निकाह, तिहेरी तलाक आणि हलाला या जाचक प्रथांवरही चित्रण !
  • २२ एप्रिल या दिवशी जागतिक स्तरावर होणार प्रदर्शित !

(‘स्क्रीनिंग’ म्हणजे चित्रपटाच्या प्रचारार्थ ठराविक लोकांना तो दाखवणे)

नवी देहली – हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रावर प्रकाश टाकणारा ‘द कन्वर्झन’ हा हिंदी चित्रपट २२ एप्रिल या दिवशी जगभरात प्रदर्शित होत आहे. त्याच्या प्रचारार्थ अमेरिकेतील काही शहरांमध्ये त्याचे ‘स्क्रीनिंग’ केले जात आहे. काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क येथे, तर २ एप्रिलला शिकागो येथे झालेल्या ‘स्क्रीनिंग’ला उदंड प्रतिसाद लाभला. अटलांटा शहरात ३ एप्रिल आणि सॅन फ्रॅन्सिस्को अन् डलास येथे ९ एप्रिल या दिवशी या चित्रपटाचे खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विनोद तिवारी यांचे दिग्दर्शन आणि राज पटेल यांची निर्मिती असलेला हा चित्रपट केवळ ‘लव्ह जिहाद’पुरताच मर्यादित नसून निकाह, तिहेरी तलाक आणि हलाला या इस्लाममधील जाचक प्रथांवरही प्रकाश टाकणारा आहे.

मुसलमान मुले प्रेमाचे शस्त्र म्हणून वापर करून हिंदु मुलींना फसवतात आणि त्यांचे धर्मांतर करतात ! – सत्या दोसापती, अमेरिकेतील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि लेखक

हा चित्रपट पाहून अमेरिकेतील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि लेखक सत्या दोसापती यांनी लेख लिहिला. त्यात ते म्हणतात,

१. या चित्रपटातून लव्ह जिहादचे भयावह प्रसंग पाहून मन विषण्ण होते. दोन प्रौढ व्यक्ती संगनमताने विवाह करण्यात काहीच चुकीचे नाही; परंतु प्रेमाचा देखावा करून फसवून विवाह करणे, हे सर्वथा चुकीचे आहे.

२. मुसलमान मुले प्रेमाचे शस्त्र म्हणून वापर करून हिंदु मुलींना फसवतात आणि त्यांचे धर्मांतर करतात.

३. जर सामाजिक चर्चा करून तिहेरी तलाकवर घटनात्मक बंदी घालण्यात आपल्याला यश आले, तर लव्ह जिहाद, बहुपत्नीत्व, हलाला यांवरही व्यापक चर्चा करून त्यांवरही बंदी घालण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

४. हा चित्रपट प्रत्येक युवती, पालक, तसेच प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी सर्वांनी पाहून जागृत होण्याची आवश्यकता आहे.

चित्रपटाविषयी प्रसारित करण्यात आलेले व्हिडिओ आणि अन्य माहिती मिळण्यासाठीचे संकेतस्थळ : www.theconversionfilm.com/en-us