कर्नाटकमधील काँग्रेसच्या मुसलमान आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कर्नाटकातील काँग्रेसचे मुसलमान आमदार अशी मागणी करू लागले आहेत, हे आश्चर्यकारकच होय ! याला साम्यवादी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्ष पाठिंबा देतील का ?
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या विधीमंडळातील मुसलमान आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) यांच्यावर बंदी घाला, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली.
Karnataka: Congress leaders meet CM Bommai; demand ban on SDPI, PFI https://t.co/n9z1h9y3pq
— Devdiscourse (@dev_discourse) April 1, 2022
‘हिजाब, हलाल यांसारख्या अनेक सूत्रांवरून कर्नाटक राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी एस्.डी.पी.आय. आणि पी.एफ्.आय. उत्तरदायी आहेत’, असा आरोप करत त्यांनी या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली.