पाकमध्ये अपहरणाला विरोध केल्याने भररस्त्यात हिंदु तरुणीची गोळ्या झाडून हत्या

भारताच्या फाळणीपासून पाकमधील हिंदू असुरक्षित आहेत. त्यांचा सातत्याने वंशसंहार चालू आहे. फाळणीच्या काळात पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांंपर्यंत घटले आहे. याविषयी कुणीच काही बोलत नाही. हा निधर्मीवादी, पुरो(गामी) मानवाधिकार संघटना यांचा दांभिकपणाच होय ! – संपादक

पाकच्या सिंध प्रांतातील हत्या करण्यात आलेली हिंदु तरुणी पूजा ओड

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील रोही सुक्कूर येथे पूजा ओड या १८ वर्षीय मुलीची धर्मांधाकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूजा हिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतांना तिने त्याला विरोध केल्याने धर्मांधांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. भररस्त्यात दिवसाढवळ्या ही घटना घडली.

१. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अल्पसंख्यांक तरुणी आणि नागरिक यांच्यावर आक्रमण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रत्येक वर्षी ख्रिस्ती आणि हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर केले जाते. अशा वाढत्या गुन्ह्यांविषयी आवश्यक ती कठोर कारवाई पाकिस्तान सरकारकडून होतांना दिसत नसल्याची टीका अनेक मानवाधिकार संघटनांकडून करण्यात येते.

२. सिंधमधील प्रांतीय सरकारने बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह यांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला; परंतु ‘मुसलमान पुरुषांच्या कथित प्रेमापोटी मुली इस्लाम स्वीकारतात’, असे म्हणत धर्मांधांनी या विधेयकाला विरोध दर्शवला होता.

३. ‘पीपल्स कमिशन फॉर मायनॉरिटीज् राईटस’ आणि ‘सेंटर फॉर सोशल जस्टीस’ यांच्या म्हणण्यानुसार, वर्ष २०१३ ते २०१९ या कालावधीत बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या १५६ प्रकरणांची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

४. ‘पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’नुसार पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येच्या १.६० टक्के, तर सिंधमध्ये ६.५१ टक्के हिंदु समुदाय रहात आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदू रहातात. येथील मुसलमानांसमवेत ते त्यांची संस्कृती आणि भाषा यांच्याशी जुळवून घेतात; परंतु याच भागातून अल्पसंख्य महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे गेल्या काही वर्षांत समोर येत आहे.