१. प.पू. दास महाराज यांच्या आगमनापूर्वी त्यांची बैठकव्यवस्था असलेल्या ठिकाणाहून दैवी सुगंध येणे
‘२७.१०.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज दैवी बालकांच्या मुखातून निघणारी अमृतवाणी ऐकण्यासाठी ध्वनीचित्रीकरण कक्षात येणार होते. तेव्हा ते येण्यापूर्वीच त्यांची बैठकव्यवस्था असलेल्या ठिकाणाहून मला अष्टगंधाचा सुगंध येऊ लागला. त्या वेळी ‘त्यांच्या येण्यापूर्वीच ध्वनीचित्रीकरण कक्षात हनुमान आला आहे आणि त्यामुळेच तेथे दैवी सुगंध दरवळू लागला आहे’, असे मला जाणवले. असा सुगंध २ दिवसांपूर्वीही मला जाणवला होता. मला वाटले की, ‘प.पू. दास महाराज यांची निरागस भक्ती हनुमानाला पुष्कळ प्रिय आहे !’
२. प.पू. दास महाराज आल्यानंतर हनुमान स्तोत्राचे पठण करत असतांना हनुमानाचे अस्तित्व जाणवणे
प.पू. दास महाराज यांचे आगमन झाल्यावर त्यांनी मारुतीची स्तुती करत स्तोत्रांचे पठण केले. ते स्तोत्रपठण करत असतांना तेथे प्रत्यक्षात हनुमान आल्याचे मला जाणवले. हनुमानाची उंची ८ फूट असेल आणि त्याला लांब पांढरे केसही होते. हे नंतर प.पू. दास महाराज यांनीही मला सांगितले.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पिठ. (२७.१०.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |