चीनने नेपाळची भूमी बळकावली ! – नेपाळ सरकारचा अहवाल

चीनने नेपाळची भूमी गिळंकृत केली असली, तरी नेपाळमध्ये चीनकडून ती परत घेण्याची क्षमता नाही. चीनच्या आहारी गेलेले ‘नेपाळ, पाक, श्रीलंका आदी देशांना ‘चीन भविष्यात आमचा देश गिळंकृत करणार’, हे लक्षात येत आहे, हेही मोठेच म्हणावे लागेल !

काठमांडू (नेपाळ) – चीनने नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण केल्याचे नेपाळने आतापर्यंत अनेकदा नाकारले होते; मात्र आता नेपाळ सरकारचाच एक अहवाल समोर आला आहे. यात नेपाळने चीनवर पश्‍चिम नेपाळमधील त्याच्या सीमेवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.

नेपाळच्या पश्‍चिमेकडील हुमला जिल्ह्यात चीन घुसखोरी करत असल्याच्या आरोपांना उत्तर म्हणून हा अहवाल गेल्या सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आला होता. त्यावेळी नेपाळ सरकारने हुमलाच्या उत्तरेकडील भागात असलेल्या नेपाळ-चीन सीमेचा अभ्यास करण्यासाठी गृह सचिवांच्या नेतृत्वाखाली ७ सदस्यीय समिती स्थापन केली होती. नेपाळ-चीन सीमेवरील वादाचा अभ्यास करण्यासाठी गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती.