‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन संस्था’ यांच्या संकेतस्थळावर वाचा नूतन लेखमालिका !
सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !
ज्ञानप्राप्तकर्ते : श्री. निषाद देशमुख (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
लेख ५
(लेख ४) ‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा लाभ घेण्याबाबत साधकांची विदारक स्थिती’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/543364.html
अनुक्रमणिका
१. आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी बघितल्यावर नामजपादी उपाय होण्याची कारणे
१ अ. चित्रीकरण केल्यावर वातावरणातील कार्यरत ईश्वराच्या संकल्पशक्तीला बद्धता येणे
१ अ १. (एका परिच्छेदाचे एक वाक्य असणारे कठीण आणि सोपे ज्ञान)
१ आ. साधकांच्या भावामुळे सुप्त स्वरूपात असलेली ईश्वरी शक्ती जागृत होऊन उपाय होणे
१ इ. प.पू. डॉक्टरांसारख्या परात्पर गुरूंच्या संकल्पशक्तीमुळे उपाय होणे
२. ‘सनातन धर्मसत्संग’, म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या संकल्पशक्तीमुळे शिवाच्या ज्ञानलहरींना चालना मिळून साकार झालेले समष्टी सत्संग
२ अ. उत्पत्ती
२ आ. प्रस्तुतकर्ता
२ आ १. निर्गुण (कळण्यास कठीण मूळ मोठे वाक्य आणि कळण्यासाठी लहान केलेले वाक्य)
२ आ १. टीप १ – शब्दमय ज्ञानबीज
२ आ १. टीप २ – प्रस्तुती
२ आ २. सगुण(कळण्यास कठीण मूळ मोठे वाक्य आणि कळण्यासाठी लहान केलेले वाक्य)
२ आ २ अ. प्रज्ञावंत जिवाला माध्यम केल्यामुळे झालेला लाभ
२ इ. सनातन धर्मसत्संगांमुळे होणारे लाभ
२ इ १. निर्गुण
२ इ २. सगुण
२ ई. प्रसारासाठी तबकडीचा वापर करण्यामागील शास्त्र
३. सनातनच्या राखीतील घटक, त्यांचे स्वरूप प्रक्षेपित होणार्या चैतन्य लहरींचे स्वरूप आणि कार्य
राखीतील घटक –
३ अ. राखीतील पहिले कापडी फूल
३ आ. राखीतील दुसरे फूल
३ इ. राखीला बांधणारा धागा
३ ई. गुरुतत्त्वाचे चिन्ह
ज्ञान पडताळण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आलेली अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना या ज्ञानाची धारिका संगणकावर उघडल्यावरच तीव्र त्रास जाणवणे; म्हणून धारिका १५ वर्षे पडताळता न येणेमी ३१.१०.२००६ या दिवशी ही धारिका प्रथम पाहिली. पाहिल्यावरच मला तीव्र त्रास जाणवला; म्हणून मी धारिका पडताळली नाही. नंतर मी २०.१२.२००९, २८.१२.२०११, ९.६.२०१५, २३.११.२०२० या दिवशीही धारिका पडताळू शकलो नाही. १९.१२.२०२० या दिवशी धारिका पडताळता आली; पण परत २१.८.२०२१ या दिवशीही धारिका पडताळू शकलो नाही. त्यानंतर ६.१२.२०२१ या दिवशी धारिका पडताळता आली. या वेळी लक्षात आले की, वर्ष २००६ मध्ये मिळालेले ज्ञान १५ वर्षांनी , म्हणजेच वर्ष २०२१ मध्ये एका दिवशी ४-५ वेळा वाचल्यानंतर त्याचा अर्थ लक्षात आला. – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (६.१२.२०२१) |
१. आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी बघितल्यावर नामजपादी उपाय होण्याची कारणे
(परात्पर गुरु) डॉ. आठवले : आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी बघितल्यावर उपाय होत असल्याचे अनेक साधकांना जाणवते, याचे कारण काय ?
एक ज्ञानी :
१ अ. चित्रीकरण केल्यावर वातावरणातील कार्यरत ईश्वराच्या संकल्पशक्तीला बद्धता येणे
ध्वनीचित्र तबकडीच्या माध्यमातून साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय व्हावे, या प.पू. डॉक्टरांच्या इच्छेमुळे ध्वनीचित्रीकरणाच्या वेळी ईश्वराची संकल्पशक्ती विविध स्थूल घटकांच्या माध्यमांतून किंवा निर्गुणात्मक सगुण स्तरावर कार्यरत होऊन साधकांना चैतन्य मिळते. ‘ध्वनीचित्रीकरण होऊन त्याचा सर्व साधकांना लाभ व्हावा’, या प.पू. डॉक्टरांच्या सुप्त निर्गुणात्मक इच्छा संकल्पामुळे स्थूल घटकांबरोबर ईश्वराची कार्यरत शक्ती तिला निर्गुणात्मक-सगुणात्मक-सगुण या स्वरूपाचा प्रत्यक्ष क्रियाबंध साकार झाल्यावर बद्धता येते. (टीप) त्यामुळे स्थूल बद्धता घटकांबरोबर ईश्वराची कार्यरत शक्तीही काल, शब्द आणि रूप या प्रकारच्या सूक्ष्म माध्यमातून बद्ध होते.
ज्या वेळी या सर्वांपैकी कोणताही एक घटक पुन्हा प्रत्यक्ष क्रिया करतो, त्या वेळी ईश्वराची संकल्पशक्तीही क्रिया करून ईश्वराची समष्टी संकल्पशक्ती प.पू. डॉक्टरांच्या निर्गुण इच्छेमुळे जागृत होऊन साधकांवर नामजपादी उपाय करते.
(श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.८.२००६, दुपारी १.४६)
टीप – प्रथम वाचण्यात वरील परिच्छेदातील अधोरेखित वाक्याचा अर्थ कळला नाही. १९.१२.२०२० या दिवशीही अर्थ कळला नव्हता. ६.१२.२०२१ या दिवशी वाक्यात व्याकरणाच्या थोड्या सुधारणा केल्यावर अर्थ कळणे सुलभ झाले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१ अ १. सुमारे ६ ओळींचे एक वाक्य असणारे कठीण आणि सोपे ज्ञान
१ अ १ अ. कठीण ज्ञान
एक ज्ञानी : ध्वनीचित्रीकरणाच्या वेळी कार्यरत असलेल्या प.पू. डॉक्टरांच्या सुप्त निर्गुणात्मक इच्छासंकल्पामुळे ध्वनीचित्रीकरण करतांना केल्या जाणार्या विविध स्थूल कृतींबरोबर प्रत्येक कृतीच्या मागे असलेली कर्ताजन्य अकर्तृत्व-स्वरूपाची ईश्वराची कार्यदर्शकता-स्वरूपाची शक्ती प.पू. डॉक्टरांच्या संकल्पावर कार्यरत होऊन निर्गुणात्मक, निर्गुणात्मक-सगुण अन् सगुण या प्रकारच्या मूळ शक्तीरूपाला प्रकट करण्यासाठी लागणारी क्रिया-संचारणतेमुळे निर्माण होणार्या क्रियाबंधातून साकारत्वाला येते आणि त्यानंतर कार्यस्वरूप-बद्धतेचे अंगीकरण करून प्रकट किंवा अप्रकट स्तरावर कर्मेंद्रियांच्या स्तरावर ज्ञात होणार्या स्तरावर कार्य करते.
– (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १७.११.२००६, दुपारी २.१२)
१ अ १ आ. थोडे सोपे केलेले ज्ञान
एक ज्ञानी : ध्वनीचित्रीकरणाच्या वेळी कार्यरत असलेल्या प.पू. डॉक्टरांच्या सुप्त निर्गुणात्मक इच्छासंकल्पामुळे ध्वनीचित्रीकरण करतांना केल्या जाणार्या विविध स्थूल कृतींबरोबर प्रत्येक कृतीच्या मागे असलेली कर्ताजन्य अकर्तृत्व-स्वरूपाची (अस्तित्वस्वरूपी प्रभास्वरूपाची) ईश्वराची कार्यदर्शकता-स्वरूपाची शक्ती प.पू. डॉक्टरांच्या संकल्पावर कार्यरत होऊन निर्गुणात्मक (मूळ निर्गुणावर आधारित स्थळ आणि काळ यांच्याप्रमाणे असलेल्या शक्तीने धारणजन्य कार्यासाठी कार्यान्वित होणे), निर्गुणात्मक-सगुण (गतीमान जगताशी निगडित होऊन कार्यरत होणारी शक्ती म्हणजेच कालबद्धता) अन् सगुण (स्थूल जगताच्या सूक्ष्म आधारात्वतेसाठी कार्यरत होणारी क्रियास्वरूप ईश्वराची शक्ती म्हणजेच स्थान) या प्रकारच्या मूळ शक्तीरूपाला प्रगट करण्यासाठी लागणारी क्रिया-संचारणतेमुळे निर्माण होणार्या क्रियाबंधातून साकारत्वाला येते आणि त्यानंतर कार्यस्वरूप-बद्धतेचे अंगीकरण करून प्रकट (सूक्ष्म प्रत्यक्ष स्पर्शात्मक जाणीवता) किंवा अप्रकट (सूक्ष्म अनुभवजन्य जाणीव) स्तरावर कर्मेंद्रियांच्या स्तरावर ज्ञात होणार्या स्तरावर कार्य करते.
– (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १७.११.२००६, दुपारी २.१२)
१ आ. साधकांच्या भावामुळे सुप्त स्वरूपात असलेली ईश्वरी शक्ती जागृत होऊन आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे
एखाद्या साधकाचा भाव असल्यास साधकाच्या भावऊर्जेमुळे सुप्त स्वरूपात असलेल्या ईश्वरी शक्तीला चालना मिळून उपायांची ध्वनीचित्र तबकडी बघितल्यावर सगुण क्रियेच्या स्वरूपाच्या माध्यमातून साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात.
१ इ. प.पू. डॉक्टरांसारख्या परात्पर गुरूंच्या संकल्पशक्तीमुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे
प.पू. डॉक्टरांसारख्या परात्पर गुरूंच्या अस्तित्वामुळे सनातन संस्थेच्या उपक्रमांसाठी समष्टी संकल्पशक्ती कार्यरत झालेली असते. त्यांच्या संकल्पशक्तीमुळे साधकांवर स्थूल माध्यमातून किंवा स्थूल माध्यम नसतांनाही आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात आणि मोठमोठ्या वाईट शक्तींवरही त्याचा परिणाम होतो.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.८.२००६, दुपारी १.५१)
२. ‘सनातन धर्मसत्संग’, म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या संकल्पशक्तीमुळे शिवाच्या ज्ञानलहरींना चालना मिळून साकार झालेले समष्टी सत्संग
२ अ. उत्पत्ती
२ अ १. निर्गुण
२ अ १ अ. कळण्यास कठीण मूळ मोठे वाक्य : प.पू. डॉक्टरांच्या तत्त्वस्वरूपी क्रियात्मक चालनेतून, म्हणजेच प्रत्यक्ष तारक स्वरूपाच्या अवतारी कार्याच्या चालनात्मकतेमुळे निर्माण झालेल्या संकल्प ऊर्जेतून निर्गुण शिवतत्त्वाच्या अस्तित्वजन्य कार्यमय प्रभावळीतून ज्ञानजन्य स्थिर लहरींना संकल्प शक्तीरूपी क्रियालहरींचा आधार मिळाल्यामुळे ज्ञानमय चालनात्मक प्राप्त होऊन शिवाच्या ज्ञानमय क्रियाशक्तीतून ‘सनातन धर्मसत्संगां’ची उत्पत्ती झाली.
२ अ १ आ. कळण्यासाठी छोटी केलेली वाक्ये : प.पू. डॉक्टरांच्या तत्त्वस्वरूपी क्रियात्मक चालनेतून, म्हणजेच प्रत्यक्ष तारक स्वरूपाच्या अवतारी कार्याच्या चालनात्मकतेमुळे संकल्प ऊर्जा निर्माण झाली. त्या संकल्प ऊर्जेतून निर्गुण शिवतत्त्वाच्या अस्तित्वजन्य कार्यमय प्रभावळीतून ज्ञानजन्य स्थिर लहरींना संकल्प शक्तीरूपी क्रियालहरींचा आधार मिळाला. त्यामुळे ज्ञानजन्य लहरींना चालनात्मकता प्राप्त होऊन शिवाच्या ज्ञानमय क्रियाशक्तीतून ‘सनातन धर्मसत्संगां’ची उत्पत्ती झाली.
२ अ २. सगुण
२ अ २ अ. कळण्यास कठीण मूळ मोठे वाक्य : प.पू. डॉक्टरांच्या सनातन अस्तित्वरूपी संकल्प शक्तीमुळे साकार झालेल्या ज्ञानमय क्रियालहरींना प.पू. डॉक्टरांनी ब्रह्मस्थितीत स्थिर राहून स्वतःच्या मायास्वरूपी, म्हणजेच कार्यरूपी अस्तित्वातून ज्ञानमय क्रियालहरींना ग्रहण करू शकणार्या जिवांकडे स्वतःच्या आत्मशक्तीच्या आधारे प्रक्षेपित केल्यामुळे धारकता नसतांनाही गुरुबळावर, म्हणजेच गुरुबळाच्या आधारावर साधकांना ते ग्रहण करणे शक्य झाले. प.पू. डॉक्टरांच्या संकल्प ऊर्जेच्या बळावर साधकांना सनातन धर्मसत्संगाचे संचालन आणि ईश्वराला अपेक्षित असे प्रकटीकरण करणे शक्य झाले.
२ अ २ आ. कळण्यासाठी छोटी केलेली वाक्ये : प.पू. डॉक्टरांच्या सनातन अस्तित्वरूपी संकल्पशक्तीमुळे ज्ञानमय क्रियालहरी साकार झाल्या. प.पू. डॉक्टरांनी ब्रह्मस्थितीत स्थिर राहून स्वतःच्या मायास्वरूपी, म्हणजेच कार्यरूपी अस्तित्वातून ज्ञानमय क्रियालहरींना ग्रहण करू शकणार्या जिवांकडे स्वतःच्या आत्मशक्तीच्या आधारे प्रक्षेपित केले. त्यामुळे धारकता नसतांनाही गुरुबळावर, म्हणजेच गुरुबळाच्या आधारावर साधकांना ते ग्रहण करणे शक्य झाले. प.पू. डॉक्टरांच्या संकल्पऊर्जेच्या बळावर साधकांना सनातन धर्मसत्संगाचे संचालन आणि ईश्वराला अपेक्षित असे प्रकटीकरण करणे शक्य झाले.
२ आ. प्रस्तुतकर्ता
२ आ १. निर्गुण
२ आ १ अ. कळण्यास कठीण मूळ मोठे वाक्य : कलीयुगासारख्या आकुंचनात्मक काळात, म्हणजेच लयाच्या, तसेच रज-तमरूपी मूळ बिजांचे प्राबल्य असलेल्या काळात ईश्वराच्या निर्गुण लहरींना एकत्रित करून त्यांच्यात दडलेल्या एकरूपतेला क्रियामय स्वरूपाच्या चालनेच्या आधारे शब्दमय ज्ञानबिजांच्या (टीप १) स्वरूपात निर्गुणात्मक-सगुण स्वरूपात उत्पत्तीत आणण्यासाठी विभाजित करण्याचे कार्य खूप क्लिष्ट आहे. प.पू. डॉक्टरांसारखे समष्टी धर्मगुरु हेच या कार्यासाठी योग्य असल्यामुळे ईश्वराने प.पू. डॉक्टरांना आधार देऊन या धर्मसत्संगांची प्रस्तुती (टीप २) केली.
२ आ १ आ. कळण्यासाठी छोटी केलेली वाक्ये : कलीयुगासारखा आकुंचनात्मक काळ, म्हणजेच लयाचा, तसेच रज-तमरूपी मूळ बिजांचे प्राबल्य असलेला काळ. या काळात ईश्वराच्या निर्गुण लहरींना एकत्रित करून त्यांच्यात दडलेल्या एकरूपतेला क्रियामय स्वरूपाच्या चालनेच्या आधारे शब्दमय ज्ञानबिजांच्या (टीप १) स्वरूपात निर्गुणात्मक-सगुण स्वरूपात उत्पत्तीत आणण्यासाठी विभाजित करण्याचे कार्य खूप क्लिष्ट आहे. प.पू. डॉक्टरांसारखे समष्टी धर्मगुरु हेच या कार्यासाठी योग्य असल्यामुळे ईश्वराने प.पू. डॉक्टरांना आधार देऊन या धर्मसत्संगांची प्रस्तुती (टीप २) केली.
२ आ १ अ टीप १ – शब्दमय ज्ञानबीज : शब्दक्रियांच्या, म्हणजेच ईश्वराच्या शब्दातीत क्रियांना अनुभवमय शब्द स्वरूपात, म्हणजेच पश्यंतीमय माध्यमाच्या स्वरूपात उत्पत्तीस आणण्यास कारणीभूत मूळ प्रकटीकरणात्मक बिजाला ‘शब्दमय ज्ञानबीज’ म्हटले आहे.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.८.२००६, दुपारी २.३४)
२ आ १ अ टीप २ – प्रस्तुती : ही मायिक संज्ञा आहे. निर्गुणातून सगुणात येत असतांना होणार्या क्रियेच्या प्रत्यक्ष प्रवाहजन्य स्वरूपाला या शब्दजन्य स्फुरणतेच्या माध्यमातून प्रकट केले जाते.’
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.८.२००६, दुपारी २.३१)
२ आ २. सगुण
प्रज्ञावंत शिष्य हाच गुरूंच्या स्वस्वरूपाला ओळखण्यास सिद्ध असतो. त्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांनीही प्रज्ञावंत जिवाला, म्हणजेच गुरुमायेतून प्रक्षेपित होणार्या कृपास्वरूप लहरींना ग्रहण करण्यास समर्थ असणार्या जिवाला या कार्यासाठी निवडले. प्रज्ञावंत जिवालाच कार्यारंभापासून स्वयंसिद्ध करण्यास प्रारंभ केल्यामुळे प्रज्ञावंत जीव हळूहळू स्वयंपूर्णतेकडे, म्हणजेच आत्मप्रकाशी अवस्थेकडे वळण्यास प्रारंभ होतो आणि गुरुमायेतूनही गुरूंच्या प्रकाशमय अस्तित्वात हळूहळू विलीन होण्यास आरंभ होतो.
२ आ २ अ. प्रज्ञावंत जिवाला माध्यम केल्यामुळे झालेला लाभ : प्रज्ञावंत जिवात ईश्वराच्या सूक्ष्मतम ज्ञानलहरींना ग्रहण करून त्यांची घनीभूतता प्रत्यक्ष जडत्वदर्शक स्वरूपात, म्हणजेच शब्द स्वरूपात उत्पत्ती करणे सोपे असते. याचबरोबर आकलनात्मक शब्दक्रियांच्या माध्यमातून अप्रकट भावस्थितीच्या ऊर्जाबळावर ज्ञानाचे प्रक्षेपण करणेही प्रज्ञावंत जिवाला स्वतःच्या आत्मशक्तीच्या बळावर शक्य होते. त्यामुळे त्यांना स्थूल स्तरावर ईश्वराला अपेक्षित असे ३० टक्के प्रस्तुतीकरण करणे शक्य होते.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.८.२००६, दुपारी २.५६)
२ इ. सनातन धर्मसत्संगांमुळे होणारे लाभ
२ इ १. निर्गुण
२ इ १ अ. प.पू. डॉक्टरांसारख्या अद्वितीय संज्ञा असलेल्या जिवाद्वारे हा सत्संग चालू झाल्यामुळे ईश्वराची निर्मळ शक्ती ज्ञानशक्तीच्या स्वरूपात कार्यरत झाली. पुढच्या काळात हीच शक्ती प.पू. डॉक्टरांना माध्यम करून पूर्ण समाजात कधीही न झालेले अलौकिक कार्य करील.
२ इ १ आ. ज्ञानशक्तीचा वाईट शक्तींच्या बरोबरच्या युद्धात होणारा लाभ : ज्ञानशक्तीची क्रियालहरींच्या आधारे उत्पत्ती होते. त्यामुळे तिची घातकता १० टक्क्यांनी वाढलेली असल्यामुळे वाईट शक्तींवर या शक्तीचा मोठे आक्रमण होऊन वाईट शक्तींची राज्यसत्ता १० टक्के नष्ट होईल.
२ इ १ इ. तीव्र वाईट शक्तींचा त्रास असलेल्या जिवांवर या ध्वनीचित्र तबकडीच्या माध्यमातून चैतन्य मिळेल.
२ इ १ ई. अनुभूती : या भागाचे टंकलेखन करतांना मला ‘माझा पायजमा कुणीतरी ओढत आहे’, असे जाणवले. मी सहज खाली बघितल्यावर मला एक भाजलेला आणि रक्ताने चिंब भिजलेला हात माझा पायजमा ओढत असल्याचे दिसले. मी डोळे मिटून प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे स्मरण केल्यावर तो हात लुप्त झाला. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे एवढे भयानक दृश्य बघूनही मला काहीच वाटले नाही.
– श्री. निषाद देशमुख, भोपाळ
२ इ २. सगुण
अ. प.पू. डॉक्टरांनी धर्मज्ञानाचा परिचय करून देणारी अलौकिक अशी सत्संग शृंखला चालू केल्यामुळे पूर्ण समाजाची धर्मज्ञानता वाढून हळूहळू समाज धर्मपालनाकडे वळेल.
आ. या सत्संगांमुळे भारतातील १ टक्का जीव साधना करण्यास आरंभ करतील.
इ. या सत्संगांमुळे समाजातील अनेक जीव आपत्काळात सनातनला साहाय्य करतील.
ई. या सत्संगांमुळे समाजात चैतन्याचे प्रक्षेपण होऊन वाईट शक्तींचा प्रभाव कमी होईल.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.८.२००६, दुपारी ३.१९)
२ ई. प्रसारासाठी तबकडीचा वापर करण्यामागील शास्त्र
तबकडीत प्रक्षेपण आणि प्रभावळमय आकर्षणक्षमता अन्य सर्व घटकांच्या तुलनेत जास्त असते. तबकडीचा प्रयोग धर्मसत्संगांसाठी केल्यामुळे तबकडीची प्रक्षेपणक्षमता आणि आकर्षणता यांमुळे जास्त मनुष्यबळाचा वापर न होता सहजतेचे, म्हणजेच ईश्वराच्या संकल्पशक्तीचे तबकडीच्या आकर्षणतेच्या माध्यमातून प्रक्षेपण होऊन प्रसार होईल.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.८.२००६, दुपारी ३.२४)
३. सनातनच्या राखीतील घटक, त्यांचे स्वरूप प्रक्षेपित होणार्या चैतन्य लहरींचे स्वरूप आणि कार्य
३ अ. राखीतील घटक
३ अ १. राखीतील पहिले कापडी फूल
अ. स्वरूप : निर्गुणात्मक सगुण
आ. प्रक्षेपित होणार्या चैतन्य-लहरींचे स्वरूप : राखीच्या घनीभूततेसाठी गोलाकार कारंजाचे स्वरूप
३ अ २. राखीतील दुसरे फूल
अ. स्वरूप : चैतन्यदायी स्वरूपाच्या घनीभूततेतून आकारत्व होत असतांना घडत असलेली प्रक्रिया
आ. प्रक्षेपित होणार्या चैतन्य-लहरींचे स्वरूप : चैतन्य राखीच्या सगुण ब्रह्मकक्षेबरोबर ऊर्ध्वात्मक निर्गुण ब्रह्मकक्षेत अस्तित्वात्मक आकाराच्या स्वरूपात फिरते.
इ. कार्य : प.पू. डॉक्टरांच्या आत्मशक्तीद्वारे एकत्रित झालेल्या ऊर्जा-लहरींना प्रत्यक्ष घनीभूत स्वरूपात येण्यासाठी, साकारत्वरूपी आकारात येण्यासाठी आधाररूपी पृथ्वीजन्यरूपी कार्य राखीतील फुलाच्या माध्यमातून होते.
३ अ ३. राखीला बांधणारा धागा (निर्गुण स्वरूपाच्या ईश्वराच्या चैतन्य- लहरींना सगुण कार्यासाठी घनीभूत करून प्रत्यक्ष कार्यप्रवण होणारी प्रक्रिया)
अ. स्वरूप : आडव्या स्वरूपात असणार्या धाग्यांशी ब्रह्मांडातील साधर्म्य घालून अनेक सूक्ष्म-रेषांच्या स्वरूपात राखी सूक्ष्मतम स्तरापर्यंत कार्य करते.
आ. प्रक्षेपित होणार्या चैतन्य-लहरींचे स्वरूप : ईश्वराच्या निर्गुण शक्तीलहरींना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून ब्रह्मांड पोकळीला गवसणी घालणार्या कार्यानुमेय प्रकट बळाला स्थूल स्वरूपात कार्य करण्यासाठी धागा दुव्याच्या स्वरूपात कार्य करतो.
इ. कार्य : ईश्वराच्या निर्गुण शक्तीलहरींना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून ब्रह्मांड पोकळीला गवसणी घालणार्या कार्यानुमेय प्रकट बळाला स्थूल स्वरूपात कार्य करण्यासाठी धागा दुव्याच्या स्वरूपात कार्य करतो.
३ अ ४. गुरुतत्त्वाचे चिन्ह (प्रत्यक्ष स्थितीजन्यात्मक स्वरूपात असलेल्या बळाचे प्रत्यक्ष कार्य ऊर्जेच्या आधार गतीमान करणारी चालनात्मक दर्शक कृती)
अ. स्वरूप : गोलाकारात्मक आच्छादनाच्या स्वरूपात ऊर्ध्व दिशा आणि अधस दिशा या दोन्ही दिशांस कार्यरत होणार्या अस्तित्वरूपी सगुण वलयात हे आच्छादन निर्माण होऊन राखीतून सारखे बाहेर पडते.
आ. प्रक्षेपित होणार्या चैतन्य-लहरींचे स्वरूप : प.पू. डॉक्टरांच्या आत्मशक्तीच्या आधारे कार्यान्वित होणार्या सूक्ष्मातीत शक्तीला कार्यबंधाच्या स्वरूपात कार्यासाठी सूक्ष्मतम स्तरावर आणण्यासाठी घनीकरणाच्या प्रक्रियेत घनत्वता (ग्रहण करणे) आणि घनीभूतता (चित्रात साठवणे) या दोन्ही स्तरांवर गुरुतत्त्वाचे बोधचिन्ह कार्य करून स्थिरत्वाच्या स्वरूपात असलेल्या शक्तीला घनीभूतता प्रदान करते.
इ. कार्य : गोलाकारात्मक आच्छादनाच्या स्वरूपात ऊर्ध्व दिशा आणि अधस दिशा या दोन्ही दिशांस कार्यरत होणार्या अस्तित्वरूपी सगुण वलयात हे आच्छादन निर्माण होऊन राखीतून सारखे बाहेर पडते.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.८.२००६, दुपारी १.१३)
सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले अन् पृथ्वीवर आतापर्यंत उपलब्ध नसणारे अद्वितीय ज्ञान !या सदराच्या माध्यमातून सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेल्या आणि पृथ्वीवर आतापर्यंत उपलब्ध नसणार्या अद्वितीय ज्ञानाची कल्पना वाचकांना मिळावी, या उद्देशाने ते येथे प्रसिद्ध करत आहोत. हे ज्ञान काही वेळा कळण्यास कठीण असते, तर काही वेळा सोपे असते. कळण्यास कठीण असलेल्या ज्ञानाचे आकलन त्याच्या कठीण भाषेमुळे किंवा त्यामध्ये असलेल्या त्रासदायक शक्तीमुळे होत नाही. ज्ञानावर आधारित ग्रंथांचे संकलन करण्यासाठी संकलकांची आवश्यकता ! अशा या ज्ञानाच्या आधारे शेकडो ग्रंथ सिद्ध होऊ शकतील, इतके ज्ञान सनातनच्या संग्रही आहे; परंतु ज्ञानातील काठिण्य आणि मनुष्यबळाची कमतरता यांमुळे हे ज्ञान समाजापर्यंत पोचवणे शक्य झालेले नाही. यासाठी जे जिज्ञासू, वाचक किंवा साधक अशा ज्ञानाचे संकलन करू इच्छितात, त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क करावा. सध्या हे सर्व ज्ञान केवळ मराठी भाषेत उपलब्ध आहे. भाषांतर करू शकणार्यांचीही आवश्यकता ! हे ज्ञान केवळ मराठी भाषिकांसाठी मर्यादित न रहाता विश्वातील सर्व भाषांमधील जिज्ञासूंपर्यंत पोचणे आवश्यक आहे. यासाठी हे मराठी भाषेतील ज्ञान अन्य भाषांमध्ये भाषांतर करू इच्छिणार्यांचीही आवश्यकता आहे. या सेवेतही सहभागी होऊ इच्छिणार्यांनीही sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर संपर्क करावा. पत्ता – सौ. भाग्यश्री संदीप सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३ ४०१. |
|