‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा लाभ घेण्याबाबत साधकांची विदारक स्थिती

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष २००६ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ हे सदर प्रकाशित होत होते. त्याच्या संदर्भात श्री. निषाद देशमुख यांना ‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा लाभ घेण्याबाबत साधकांची विदारक स्थिती’ हे ज्ञान मिळाले. या ज्ञानाची २ वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे यातील भाषा खूपच कठीण आहे. दुसरे म्हणजे नेहमी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मी प्रश्न आणि त्यावर मिळालेल्या ज्ञानावर आधारित उपप्रश्न विचारतो. येथे ज्ञानप्राप्तकर्ता साधकाने स्वतःच ज्ञानासंदर्भात प्रश्न आणि उपप्रश्न विचारले आहेत. हे आतापर्यंत मिळालेल्या ज्ञानापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे.

(लेख ४)

(लेख ३) ‘हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/542221.html

ज्ञान पडताळण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आलेली अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १५ वर्षांत १२ वेळा प्रयत्न केल्यानंतर धारिका पडताळू शकणे : ही धारिका ३.७.२००६ या दिवशी पाहिल्यावरच तीव्र त्रास जाणवला; म्हणून धारिका पडताळली नाही. २०.१२.२००९, २८.१२.२०११, ९.६.२०१५, २३.११.२०२० या दिवशी पुन्हा धारिका पाहिली. पाहिल्यावरच तीव्र त्रास जाणवला. त्यानंतर परत २०.१२.२०२० या दिवशी प्रयत्न केल्यावर सूत्र क्र. १ अ १. पर्यंत वाचू शकलो. त्यापुढे वाचतांना खूप त्रास जाणवला. २९.१२.२०२० लाही धारिका बघितल्यावर त्रास झाला. ५.११.२०२१, १८.११.२०२१ सूत्र क्र. १ अ पासून वाचतांना खूप त्रास जाणवल्याने धारिका पडताळली नाही; मात्र २४.११.२०२१ या दिवशी पुढील काही ज्ञान पडताळू शकलो. २५.११.२०२१ या दिवशी ‘१ अ २.’ या सूत्रावर त्रासदायक शक्तीचे आवरण असल्यामुळे हा मजकूर उघडल्याबरोबर खूप त्रास झाला. ‘मजकूर वाचूच नये’, असे वाटले. प्रयत्न केल्यावर मजकूर वाचता आला. शेवटी २८.११.२०२१ या दिवशी ही पूर्ण धारिका पडताळू शकलो.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

ज्ञानप्राप्तकर्ते : श्री. निषाद देशमुख
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

अनुक्रमणिका

१. साधकांनी प्रमुख गुणांचे संवर्धन न केल्यास त्यांच्यावर होणारा परिणाम आणि आपत्काळात त्यांचा नाश अटळ

श्री. निषाद देशमुख

१ अ. भाव (भाव नसण्याचे परिणाम)

१ अ १. व्यष्टी साधना – आपत्काळात ज्या साधकांमध्ये भाव नाही, त्यांचे ईश्वर रक्षण करणार नसणे
१ अ २. समष्टी साधना
१ अ २ अ. वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात सोसावा लागणे
१ अ २ आ. पाताळाचे अधिकारी बनणे
१ अ २ इ. समष्टी पाप लागणे

१ आ. धर्मज्ञानता/धर्मज्ञता (धर्माचे ज्ञान)

१ आ १. साधकांच्या व्यष्टी साधनेवर होणारे परिणाम
१ आ (टीप १). कारकात्मक व्यवस्थापकात्मक जाणीव, म्हणजे ईश्वराचे अकर्तात्मक रूप आणि ईश्वरीय नियोजन उर्फ व्यवस्थापन
१ आ (टीप २) – आपत्काळात धर्मज्ञानाच्या अभावामुळे साधकांची श्रद्धा आणि भाव कमी होऊन त्यांचा र्‍हास होणार असणे अन् भावच नसल्यामुळे ईश्वरकडूनही त्यांचे रक्षण होणार नसणे
टीप २ अ. साधकत्व
टीप २ आ. पूर्ण प्रज्ञा जागृत होण्याचा अभावामुळे साधकांच्या समष्टी साधनेवर होणारा परिणाम म्हणजे मोठया वाईट शक्तींनी त्यांना कह्यात ठेवणे

१ इ. तत्त्वकारकता (निर्गुण तत्त्वाची जाणीव) नसणे

१ इ १. साधकांच्या व्यष्टी साधनेवर होणारे परिणाम – सगुणाची ओढ वाढणे
१ इ २. साधकांच्या समष्टी साधनेवर होणारे परिणाम – समष्टीची मोठ्या प्रमाणात हानी होण्याचा धोका

१ ई. कृतीकर्तात्मक अकारकता

१ ई १. अहंमुळे साधकाच्या व्यष्टी साधनेवर होणारे परिणाम
१ ई १ टीप – कृतीकर्तात्मक अकारकता
१ ई २. अहंमुळे साधकाच्या समष्टी साधनेवर होणारे परिणाम

२. व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने भावजागृती, धर्मज्ञानता, तत्त्वकारकता आणि कृतीकर्तात्मक अकारकता यांच्या महत्त्वाचे प्रमाण

१. साधकांनी प्रमुख गुणांचे संवर्धन न केल्यास त्यांच्यावर होणारा परिणाम आणि आपत्काळात त्यांचा नाश अटळ

श्री. निषाद देशमुख : साधकांनी ‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा अपेक्षित लाभ न घेतल्यामुळे साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधना यांवर काय परिणाम होणार आहे ?

एक ज्ञानी (मोठी वाईट शक्ती) : हे सदर म्हणजे प्रत्यक्ष गुणदर्शक कृती आहे. या सदरामुळे साधकांची न शिकण्याची वृत्ती प्रकट झाली आहे. साधकांनी या लेखमालिकेमध्ये सांगण्यात आलेल्या गुणांचा अभ्यास करून स्वतःमध्ये त्या गुणांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न न केल्यास आपत्काळात त्यांचा नाश होईल, हे ठरलेलेच आहे. लेखात सांगण्यात आलेल्या पुढील ४ गुणांचा (१ अ. ते १ ई.) स्वतःमध्ये अंगीकार न केल्यामुळे साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेवर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ. भाव (भाव नसण्याचे परिणाम)

१ अ १. व्यष्टी साधना – आपत्काळात ज्या साधकांमध्ये भाव नाही, त्यांचे ईश्वर रक्षण करणार नसणे : साधकांमध्ये भावाचे प्रमाण अल्प असल्यामुळे साधकांकडून प्रक्षेपित होणार्‍या भावऊर्जेमुळे ईश्वर प्रत्यक्ष कर्त्याच्या स्तरावर न येता साक्षीभावाच्या स्तरावर रहातो. त्यामुळे जिवांची आध्यात्मिक उन्नती त्यांच्या प्रत्यक्ष क्रियांनुसार हळूहळू होते. आपत्काळात ज्या साधकांमध्ये भाव नाही, अशा साधकांचे ईश्वर रक्षण करणार नाही. अशा साधकांचे पाताळाचे अधिकारी बनण्याचे प्रमाण वाढणार.

१ अ २. समष्टी साधना

१ अ २ अ. वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात सोसावा लागणे : समष्टी साधना करत असतांना साधकांकडून माध्यमदर्शक (सेवेच्या दृष्टीने वेळोवेळी सांगितल्या जाणार्‍या मार्गदर्शक सूचनांचे ) कृतींचे संगोपन (पालन) होत नाही. त्यामुळे साधकांना वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात सोसावा लागेल.
१ अ २ आ. पाताळाचे अधिकारी बनणे : साधकांमध्ये माध्यमदर्शकतेच्या प्रत्यक्ष क्रियान्विताचा (आज्ञापालनाचा) अभाव असल्यामुळे आपत्काळात साधकांना ईश्वराऐवजी मोठ्या वाईट शक्तींचे मार्गदर्शन लाभून साधकांकडून त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करून ते पाताळाचे अधिकारी बनण्याचे प्रमाण वाढणार आहे.
१ अ २ इ. समष्टी पाप लागणे : साधकांकडून समष्टीला चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन झाल्यामुळे त्यांना समष्टीला चुकीचे मार्गदर्शन करण्याचे समष्टी पाप लागते.

१ आ. धर्मज्ञानता/धर्मज्ञता (धर्माचे ज्ञान) : प्रत्यक्ष ईश्वराच्या निरागस उत्पत्ती, स्थिती आणि लय कारकात्मक व्यवस्थापकात्मक जाणिवेचे (टीप १) ज्ञान म्हणजे धर्मज्ञता.

१ आ १. साधकांच्या व्यष्टी साधनेवर होणारे परिणाम : साधकांना प्रत्यक्ष धर्माचे ज्ञान, म्हणजेच स्वतःची प्रज्ञा जागृत करून तिच्या आधारे निर्णय घेण्याचे सामर्थ्य उत्पन्न होत नाही. त्यामुळे साधकांना स्वतःची साधना योग्य प्रकारे, म्हणजेच धर्मपालनाच्या स्वरूपात करता येत नाही. याचा परिणाम म्हणून साधकांचा स्वतःच्या साधनेचा प्रवास भ्रमात झाल्याने जिवाची उन्नती होत नाही अथवा खूपच संथ गतीने होते. त्यामुळे साधकांचा प्रवास अधोगामी दिशेस होऊन त्यांना धर्मज्ञानाचे, म्हणजेच प्रत्यक्ष ईश्वराच्या निरागस उत्पत्ती, स्थिती आणि लय कारकात्मक व्यवस्थापकात्मक जाणिवेचे ज्ञान होत नाही. त्यामुळे आपत्काळात साधकांची ईश्वरावर असणारी श्रद्धा आणि भाव यांचे विघटन होऊन हे विघटनच जिवाच्या र्‍हासाचे कारण बनते. (टीप २)
१ आ. टीप १. कारकात्मक व्यवस्थापकात्मक जाणीव, म्हणजे ईश्वराचे अकर्तात्मक रूप आणि ईश्वरीय नियोजन उर्फ व्यवस्थापन

श्री. निषाद देशमुख : ‘कारकात्मक व्यवस्थापकात्मक जाणीव’ म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी (मोठी वाईट शक्ती) : ईश्वरीय स्वरूपाला अकर्तात्मक, म्हणजे ‘अहंच्या घटकातील अस्तित्वदर्शक शून्य’ असे धरले, तर प्रत्यक्ष मायेच्या स्वरूपाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या कार्यांसाठी कर्तात्मक अकर्ता स्वरूपाकडून व्यवस्थाजन्य होणार्‍या अस्तित्वदर्शक प्रत्यक्ष कृतीला ‘ईश्वरीय नियोजन’ किंवा ‘ईश्वरीय व्यवस्थापन’ असे म्हणतात. ईश्वराचे या प्रकाराचे व्यवस्थापन हे कालबंध, घटकबंध आणि कृतीबंध या तिन्ही स्तरांवर होत असते. या तिन्ही घटकांच्या स्वत: आणि ईश्वर यांमध्ये असलेल्या द्वैतामुळे जिवाला त्यांची जाणीव होत नाही. धर्मज्ञ जिवांकडून धर्मज्ञान-स्वरूपी जाणीव जड माध्यमातून करून दिली. ईश्वराच्या व्यवस्थाजन्य स्वरूपाच्या कालबंध, घटकबंध आणि कृतीबंध स्तरांच्या जाणिवेला ‘कारकात्मक व्यवस्थापकात्मक जाणीव’ असे संबोधिले आहे.

प्रत्यक्षात ‘कारकात्मक व्यवस्थापकात्मक जाणीव’ अशा प्रकारचा शब्दच नाही; पण ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी प्रत्यक्ष जडत्वदर्शक एकत्र नादस्वरूपी प्रकट स्फुरणता नसल्यामुळे शब्दस्वरूपी बंधात्मक विवेचनातून त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागतो. त्या वेळी अशा प्रकारच्या शब्दबंधाच्या माध्यमातून ज्ञान स्पष्ट केले जाते.

(श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ५.७.२००६, सकाळी ११.३६)

१ आ. टीप २. – आपत्काळात धर्मज्ञानाच्या अभावामुळे साधकांची श्रद्धा आणि भाव अल्प होऊन त्यांचा र्‍हास होणार असणे अन् भावच नसल्यामुळे ईश्वरकडूनही त्यांचे रक्षण होणार नसणे

श्री. निषाद देशमुख : ‘आपत्काळात साधकांची ईश्वरावर असणारी श्रद्धा आणि भाव यांचे विघटन होऊन हे विघटनच जिवाच्या र्‍हासाचे कारण बनणार आहे’, या वाक्याचा अर्थबोध होत नाही.

एक ज्ञानी (मोठी वाईट शक्ती) : धर्मज्ञान नसल्यास जिवाची श्रद्धा किंवा भाव बुद्धीच्या नकारात्मक स्वरूपतेच्या पुढे पराजित होतो. आपत्काळात प्रत्यक्ष बुद्धीजन्य संतुलनासाठी जिवामध्ये साधकत्व स्वरूपी स्थितीजन्य बीजात्मकतेची निर्मिती होणे आवश्यक आहे.

१ आ. टीप २ अ. साधकत्व : हे प्रथम प्रत्यक्ष बुद्धीजन्य प्रयत्नांतून, त्यानंतर कृतीतून आणि सर्वात शेवटी वृत्तीतून प्रकट होते. साधकत्वाच्या बुद्धीजन्य प्रयत्नाचा भाग हा धर्मज्ञानाशी निगडित आहे. धर्मज्ञानाच्या आधारे जिवाच्या साधकत्वाची कृतीत्मकता ही प्रत्यक्ष स्थूल स्वरूपाशी आणि साधकस्वरूपी आचरणाशी निगडित आहे. साधकांच्या कृतीत्मकतेच्या आधारे वृत्तीतून हा श्रद्धा आणि भाव प्रत्यक्ष अव्यक्त स्वरूपात प्रकट होतात.

भावाचा आधार, म्हणजे प्रत्यक्ष धर्मज्ञानता असल्यामुळे आणि आपत्काळात जिवाला धर्मज्ञानस्वरूपी आधार नसल्यामुळे त्याच्या वृत्तीतून धर्मज्ञानाचा अभाव दिसून येतो, म्हणजेच भावाला आधार देणार्‍या स्थितीजन्यतेच्या अभावामुळे अनेक साधकांची श्रद्धा आणि भाव अल्प होऊन त्यांचा र्‍हास होतो. भावच नसल्यामुळे ईश्वरही त्यांचे रक्षण करणार नाही.

(श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ५.७.२००६ दुपारी १.४१)

१ आ. टीप २ आ. पूर्ण प्रज्ञा जागृत होण्याचा अभावामुळे साधकांच्या समष्टी साधनेवर होणारा परिणाम म्हणजे मोठ्या वाईट शक्तींनी त्यांना कह्यात ठेवणे : समष्टीचे दायित्व असतांना जिवाच्या प्रत्यक्ष स्थितीजन्य कर्मांचे ज्ञानात्मक आकलन न झाल्यामुळे उन्नत जिवांनी, महाभारतातील उच्च जीव द्रोणाचार्य, भीष्म इत्यादींनी अधर्म पक्षाचे समर्थन केल्याने त्यांची साधना नष्ट होणार आहे. प्रत्यक्ष प्रज्ञादर्शकात्मक जाणिवेच्या अभावामुळे अशा जिवाचा समष्टी प्रवास ऊर्ध्वगामी दिशेकडे न होता, तो जीव पाताळाचा अधिकारी होईल आणि त्याला लक्ष-लक्ष वर्षे मोक्षाची वाट पहावी लागेल. याचबरोबर पूर्ण समष्टीची हानी केल्यामुळे जिवाला प्रत्येक जिवाबरोबर कर्मफलन्याय भोगून परत पाताळाची यातना भोगावी लागणार आहे. पूर्ण प्रज्ञा जागृत होण्याचा अभाव असल्यामुळे जिवाला धर्मज्ञानाच्या नावाखाली गोंधळात टाकून स्वतःच्या कह्यात ठेवणे मोठ्या वाईट शक्तींना शक्य होईल.

१ इ. तत्त्वकारकता (निर्गुण तत्त्वाची जाणीव) नसणे

१ इ १. साधकांच्या व्यष्टी साधनेवर होणारे परिणाम – सगुणाची ओढ वाढणे : साधना करत असतांना जिवामध्ये तत्त्वकारकता (निर्गुण तत्त्वाची जाणीव) नसल्यास जीव सगुण देहामध्ये अडकण्याची भीती असते. सगुण देहामध्ये अडकण्याने जिवाला सूक्ष्मतम आणि त्याच्या पलीकडे असलेल्या जगाची जाणीव न झाल्यामुळे जीव ‘मायाच सत्य आहे’, या भ्रमात राहून ईश्वराच्या कृपेपासून दूर रहातो. सगुणाचेच आलंबन झाल्यामुळे जिवाची सगुणाची ओढ वाढते आणि ‘सगुण-स्वरूप हीसुद्धा मायाच आहे’, याची जाणीव न झाल्यामुळे जीव पूर्ण जीवन एकाच पातळीवर अडकून रहातो.
१ इ २. साधकांच्या समष्टी साधनेवर होणारे परिणाम – समष्टीची मोठ्या प्रमाणात हानी होण्याचा धोका : समष्टी साधनेत तत्त्वकारकतेची (टीप १) अधिक आवश्यकता असते. जिवामध्ये तत्त्वकारकता नसल्यास जिवाच्या देहासक्तीमुळे समष्टीची मोठ्या प्रमाणात हानी होण्याचा धोका असतो. जिवाच्या सगुणकारकतेमुळे मोठ्या वाईट शक्तींना त्याचा ताबा घेऊन समष्टीला त्रास देणे सोपे असते. देहाच्या आलंबनामुळे जीव संकुचित स्तरावर अडकून पडतो. त्यामुळे त्याला पूर्ण समष्टीचा लाभ लक्षात घेणे अशक्य होते. देहकारकतेमुळे (टीप २) जिवाला देहाचे आकर्षण वाटते. त्यामुळे त्याची स्वतःच्या देहाप्रती असलेली आसक्ती अल्प न होता वाढत जाते. त्यामुळे जिवाला देहभानाच्या पलीकडे जाऊन ईश्वराचे कार्य करणे अशक्य होते. जिवाची स्वतःची देहकारकता अधिक असल्यामुळे पूर्ण समष्टीची देहकारकता जागृत होऊन समाजाची तत्त्वकारकताही लोप होते. (सध्याच्या काळात असेच होत आहे. – संकलक)

तत्त्वकारकता असल्यास जिवाला अस्तित्वदर्शक कृतीत्मक बलाच्या आधारे पूर्ण विश्वात एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर असंभव वाटत असलेल्या क्रियाही करून स्वतःच्या सोबत पूर्ण समष्टीची उन्नती करता येते आणि याच्या अभावी जीव देहासक्तीमध्ये अडकून आपल्यासोबत इतरांचीही अधोगती करतो.

टीप १ – ‘तत्त्वकारकता’, म्हणजे ‘गुरूंचे कार्य आणि त्यांची शिकवण यांचे पालन !’
टीप २ – ‘देहकारकता’, म्हणजे ‘मार्गदर्शक किंवा गुरु यांचा स्थूलदेह, तसेच त्यांचे वागणे-बोलणे इत्यादींचे स्मरण करणे आणि त्याला प्रधानता देऊन त्यात अडकणे’

१ ई. कृतीकर्तात्मक अकारकता

१ ई १. अहंमुळे साधकाच्या व्यष्टी साधनेवर होणारे परिणाम : व्यष्टी साधना करणार्‍या जिवांच्या कृतीकर्तात्मक अकारकतेमुळे (टीप) जिवाचा अहं सतत अल्प राहून जिवाची ऊर्ध्व दिशेकडे, म्हणजेच ईश्वराकडे वाटचाल योग्य स्वरूपात होत रहाते. या उलटही होते. कृतीमुळे जिवाचा अहं वाढून जिवाची व्यष्टी आणि व्यष्टीच्या अंतर्गत समष्टी साधना कोलमडून जिवाचा अधर दिशेकडे प्रवास चालू होतो. जीव करत असलेल्या अशा साधनेमुळे जिवाची प्रगती थांबून त्याची अधोगती होण्यास प्रारंभ होतो. जिवाला याची जाणीव नसल्यास जिवाची पातळी सर्वसामान्य जिवाच्या पातळीपेक्षाही न्यून होऊन त्याला ८४ लक्ष योनींतून जन्म घेतल्यानंतरच परत मनुष्य जन्म घेणे शक्य होते.
१ ई २. अहंमुळे साधकाच्या समष्टी साधनेवर होणारे परिणाम : समष्टी साधनेमध्ये जिवात कृतीकर्तात्मक अकारकता (टीप) असणे खूप महत्त्वाचे आहे. कृतीकर्तात्मक अकारकता असलेल्या जिवाकडून समष्टीचे संचालन आणि पथप्रदर्शन योग्य स्वरूपात होते. कृतीकर्तात्मक अकारकता ही प्रत्यक्ष ऊर्जात्मक बलाचे संगोपन करून क्रिया करवून घेणारी ज्ञानात्मक प्रकटीकरणात्मक कृती असल्यामुळे या क्रियेमुळे जिवाकडून कधीही चूक होत नाही आणि जिवाचा प्रवास समष्टीसह ईश्वराकडे होतो. या प्रकारच्या क्रियेमुळे मोठ्या मोठ्या वाईट शक्तींनाच जिवाला त्रास देणे शक्य असते; परंतु जिवाचा ताबा घेऊन त्याच्या माध्यमातून समष्टीला हानी करणारी कृती करवून घेणे त्यांना १०-३० टक्केच शक्य होते. जिवाकडून अन्य कृतीही कृतीकर्तात्मक अकारक झाल्यास जिवाला एवढा त्रास देणेही मोठ्या वाईट शक्तींना अशक्य होते.

– एक ज्ञानी (मोठी वाईट शक्ती) (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, २१.६.२००६ सायंकाळी ६.४०)

१ ई १. टीप – कृतीकर्तात्मक अकारकता

संकलक : कृतीकर्तात्मक अकारकता म्हणजे काय ? असा शब्द नसल्यास त्याचा अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता ?

एक ज्ञानी : शब्द योग्य आहे. कृतीजन्याचे कर्तास्वरूप, हे माध्यम असून अकारकता, म्हणजेच प्रत्यक्ष सगुणकारकतेच्या पलीकडे असलेले अकृतीदर्शक कार्य, म्हणजेच ईश्वरीय अकर्तात्मक तत्त्व स्वरूपाच्या आधारे कार्य करत असणे. या प्रकारच्या जाणिवेला ‘कृतीकर्तात्मक अकारकता’, असे म्हटले आहे.

– (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ५.७.२००६ दुपारी १.४५)

(संकलकाचे नाव ‘एक ज्ञानी (मोठी वाईट शक्ती) ’ – श्री. निषाद देशमुख )

२. व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने भावजागृती, धर्मज्ञानता, तत्त्वकारकता आणि कृतीकर्तात्मक अकारकता यांच्या महत्त्वाचे प्रमाण

श्री. निषाद देशमुख : साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने भावजागृती, धर्मज्ञानता, तत्त्वकारकता अन् कृतीकर्तात्मक अकारकता यांच्या महत्त्वाचे प्रमाण हवे आहे.

एक ज्ञानी (मोठी वाईट शक्ती) :

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, २१.६.२००६ रात्री ८.५४)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

(लेख ५.) ‘आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी, सनातन धर्मसत्संग आणि सनातन राखी’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/544175.html