१. ज्ञानयोग
या मार्गाने जाणार्या जिवांच्या ज्ञानाप्रमाणे ‘पूर्ण विश्व हे माया आहे आणि स्वतः ब्रह्म आहे’, या प्रकारच्या अद्वैत सिद्धांताचे पालन केले जाते. त्यामुळे ज्ञानयोगात समष्टी साधनेला महत्त्व नसते.
२. ध्यानयोग
या मार्गाने साधना करणार्या जिवांसाठी ध्यानाची अवस्था साध्य करण्यासाठी त्यांच्याद्वारे निर्जन वन, गुहा, हिमालय इत्यादी क्षेत्रांत निवास केला जातो. त्यामुळे ध्यानयोगात समष्टी साधनेला महत्त्व नसते.
३. गुरुकृपायोग
या मार्गाने जाणार्या जिवांसाठी समष्टी साधना सर्वांत महत्त्वपूर्ण आहे. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या जिवांच्या व्यष्टी साधनेचा भाग समष्टी साधनेतच अंतर्भूत असल्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या जिवाला वेगळे काहीच करावे लागत नाही. याच कारणास्तव गुरुकृपायोगाने जाणार्या जिवांची अन्य योगमार्गाने जाणार्या जिवांच्या तुलनेत लवकर प्रगती साध्य होते.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांच्या माध्यमातून, २२.६.२००६, दुपारी ४.२६)