स्वार्थी राजकारण्यांनी केलेली लोकशाहीची दुरवस्था !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘आजचे राजकीय पक्ष आणि राजकारणी यांचा कोणताही आदर्श राहिलेला नाही. त्यांचे फक्त एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे, येनकेन प्रकारेण निवडणुका जिंकून सत्ता मिळवणे. राजकीय पक्ष कुठलाही विचार न करता विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतात. संधीसाधू नेते सत्ता मिळवण्याच्या लालसेपोटी आपली वर्षानुवर्षे असलेली जुनी निष्ठा सोडून ज्या पक्षाच्या बाजूने वारे वहात असतात, त्या पक्षात सहभागी होतात. असे सत्तालोलुप, संधीसाधू हीन नेते या देशाचे कधीतरी कल्याण करू शकतील का? या अस्वच्छ राजकीय व्यवस्थेच्या जागी स्वच्छ आणि आदर्श राजकीय व्यवस्था आणण्यासाठी राष्ट्रप्रेमींना पुष्कळ संघर्ष करावा लागेल, तरच हिंदु राष्ट्ररूपी धर्मराज्याची स्थापना शक्य आहे. हिंदूंनो, हा पालट घडवून आणण्यासाठी तुम्ही लढायला सिद्ध आहात का ? कि तुमच्या पुढच्या पिढीला असुरक्षित, भ्रष्ट, निर्धन, कुपोषित आणि व्यभिचारयुक्त भारत देश परंपरेच्या रूपात तुम्ही देणार आहात?’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (२०.५.२०२१)