राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १७.१०.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

‘भ्रष्टाचार नाही’, असे एकतरी सरकारी खाते आहे का ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘नागपूर येथील ‘मेट्रो’ प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक (एम्.डी.) ब्रिजेश दीक्षित यांसह ‘मेट्रो’च्या ९ संचालकांनी वैद्यकीय देयकांमध्ये घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) वतीने चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी ‘जय जवान जय किसान संघटने’चे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली.

‘मेट्रो प्रकल्पा’च्या संचालकांनी ३ वर्षांत घेतलेल्या वैद्यकीय देयकांची रक्कम

अ. ब्रिजेश दीक्षित, ‘एम्.डी.’ – १ कोटी १५ लाख रुपये

आ.  महेश कुमार, ‘डब्ल्यू.टी.डी.’ – २१ लाख ८० सहस्र रुपये

इ. सुनील माथुर, ‘डब्ल्यू.आय.टी.डी.’ – ४३ लाख रुपये

ई. एस्. शिवानाथन्, ‘सी.एफ्.ओ.’ – २१ लाख रुपये

उ. रामनाथ सुब्रह्मण्यम्, ‘डब्ल्यू.टी.आय.’ – २ कोटी रुपये.’


जे हॉवर्ड विश्वविद्यालयाला कळते, ते भारतात एकाही पक्षाच्या सरकारला कळत कसे नाही ?

श्री. शिवशंकर पाटील

‘शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे तत्कालीन व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या कार्याची नोंद अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापिठाने घेतली आहे. व्यवस्थापनाचा एक आगळावेगळा नमुना म्हणून ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकवणार्‍या हॉवर्ड विद्यापिठात शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो. याचे श्रेय केवळ शिवशंकरभाऊ पाटील यांना जाते.’


‘जसे ‘व्यक्ती १०० वर्षे जगण्यासाठी तिने काय करायचे ?’, हे आयुर्वेद सांगते, तसे ‘सनातन प्रभात’१०० वर्षे आनंदी कसे रहायचे ?’, ते शिकवत आहे.’

– वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय.