काबुलमध्ये बंदुकीचा धाक दाखवत भारतीय व्यावसायिकाचे अपहरण

तालिबानी राज्यात याहून वेगळे काय घडणार ? तालिबानचे समर्थन करणारे भारतातील तालिबानीप्रेमी आता याविषयी तोंड उघडतील का ? – संपादक

उजवीकडे बसलेले व्यापारी बंसरीलाल अरेन्डेह

काबुल (अफगाणिस्तान) – येथे बंदुकीचा धाक दाखवून अफगाण वंशाचे ५० वर्षीय भारतीय नागरिक बंसरीलाल अरेन्डेह यांचे त्यांच्या दुकानातून अपहरण करण्यात आले आहे. ‘इंडियन वर्ल्ड फोरम’चे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बंसरीलाल यांचे कुटुंब देहलीमध्ये रहाते.

बंसरीलाल हे औषध उत्पादनांचे व्यापारी आहेत आणि या घटनेच्या वेळी ते त्यांच्या कर्मचार्‍यांसह त्यांच्या दुकानात व्यस्त होते. बंसरीलाल यांचे त्यांच्या कर्मचार्‍यांसह अपहरण करण्यात आले होते; पण त्यांचे कर्मचारी पळून जाण्यात यशस्वी झाले; मात्र त्यांना अपहरणकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केली. स्थानिक अन्वेषण यंत्रणांनी या संदर्भात गुन्हा नोंदवला आहे.