बिशप आणि जिहाद !

संपादकीय 

लव्ह जिहादच्या विरोधात भारतातील जन्महिंदू जागृत होऊन कृती करतील, तो सुदिन !

बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट

केरळ येथील सायरो मलबार चर्चचे बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट यांनी ‘ख्रिस्त्यांना ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्काेटिक जिहाद’ यांद्वारे जाळ्यात ओढण्यात येत आहे’, असे विधान केले होते. त्यामुळे तेथील धर्मांधांचे पित्त खवळले आहे. धर्मांधांच्या एका संघटनेने कल्लारनगट्ट यांच्या घरासमोर निदर्शने केली, तसेच काही जणांनी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.

तसे पाहिले तर बिशप कल्लारनगट्ट काय चुकीचे बोलले ? ‘लव्ह जिहाद’ हे वैश्विक सत्य आहे. त्याला कुणीही नाकारू शकत नाही. भारत निधर्मी राष्ट्र असल्यामुळे मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे काही राजकारणी आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक सांगतात आणि त्याला विरोध करणार्‍यांना ‘धर्मांध’ ठरवून मोकळे होतात. केरळमध्ये लव्ह जिहादच्या समवेत आता ‘नार्काेटिक जिहाद’ डोके वर काढू लागला आहे. मुसलमानेतर मुलांना अमली पदार्थांचे व्यसन लावून या समाजाची तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. बिशप कल्लारनगट्ट यांना धर्मांधांकडून विरोध होऊ लागल्यावर ख्रिस्ती समाजाने बिशप कल्लारनगट्ट यांना पाठिंबा दिला आहे. किती हिंदू अशा प्रकारे त्यांच्या धर्मगुरूंच्या मागे खंबीरपणे उभे रहातात, हा संशोधनाचा विषय आहे.

केरळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार आहे. साम्यवाद्यांकडून ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे लांगूलचालन करून त्यांच्या मतांवर सत्ता मिळवण्याचा प्रकार मागील कित्येक वर्षे चालू आहे. असे असले, तरी मागील काही वर्षांत ख्रिस्त्यांपेक्षा तेथील धर्मांधांचा राजकारणावर प्रभाव वाढला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचे जावई महंमद रियाझ हे मुसलमान आहेत आणि ते मंत्रीही आहेत. त्यामुळे राज्यातील २ अल्पसंख्य समाज परस्परांच्या विरोधात उभे राहिल्याने ‘साम्यवादी सरकार कुणाची बाजू घेणार ?’ याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते; मात्र अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री विजयन् यांनी कल्लारनगट्ट यांनाच दम भरला आणि ‘एखाद्या समस्येसाठी एखाद्या धर्माला लक्ष्य केले जाऊ शकत नाही’, असा फुकाचा सल्लाही दिला. ‘धर्मांधांच्या विरोधात कारवाई केल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच त्यांनी साम्यवाद्यांकडे पाठ फिरवली, तर या पक्षाला पुन्हा सत्तेवर येण्यास अडचण येऊ शकते’, असे तेथील राज्य सरकारला वाटते. त्यामुळे लव्ह जिहाद किंवा नार्कोटिक जिहाद ही सामाजिक समस्या असली, तरी त्यापासून लांब रहाणे साम्यवाद्यांनी पसंत केले; कारण समस्या सोडवण्यापेक्षा पक्षासाठी खुर्ची महत्त्वाची आहे !

‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या विरोधात ख्रिस्ती धर्मगुरूंनी विधान केल्यावर प्रसारमाध्यमे गप्प आहेत. तेच जर हिंदूंच्या धर्मगुरूंनी हे विधान केले असते, तर एव्हाना त्यांनी थयथयाट केला असता. एवढे मात्र खरे की, ख्रिस्ती समाज जिहादविषयी सजग झाला आहे. याविषयी भारतातील जन्महिंदू कधी जागृत होणार ?