न्यूझीलंडमध्ये जिहाद्याकडून ‘मॉल’मध्ये चाकूद्वारे आक्रमण : ६ जण घायाळ

  • पोलिसांच्या गोळीबारात जिहादी ठार

  • आक्रमणकर्ता जिहादी हा श्रीलंकेचा नागरिक !

जिहाद्यांनी आज संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. त्यांच्या या आतंकवादामागील जिहादी मानसिकता जाणून ती नष्ट करण्यासाठी आता संपूर्ण जगाने संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे; कारण १-२ आतंकवाद्यांना ठार करून जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक
घटनास्थळ

ऑकलंड (न्यूझीलंड) – शहरातील ‘मॉल’मध्ये (मोठ्या व्यापारी संकुलामध्ये) जिहाद्याने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये ६ जण घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा जिहादी ठार झाला. आक्रमण करणारा जिहादी हा इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेचा समर्थक होता. घायाळ झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘ही घटना दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी घडली. पोलिसांनी एका मिनिटात आक्रमणकर्त्याला ठार केले. आक्रमणकर्ता श्रीलंकेचा नागरिक होता. वर्ष २०११ मध्ये तो न्यूझीलंडला आला होता. अनेक गुप्तचर यंत्रणांकडे आक्रमणकर्त्याची माहिती होती. मला स्वतः त्याच्याविषयी माहिती होती. वर्ष २०१६ पासून त्याच्यावर लक्ष ठेवले जात होते; मात्र कायदेशीर बंधनामुळे पोलीस त्याला कारागृहात टाकू शकले नाहीत.’’ (समाजाला हानी पोचवणार्‍या व्यक्तीची सर्व माहिती असतांनाही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर बंधने येत असतील, तर असे कायदे काय कामाचे ? – संपादक)