पणजी – रविवार, ५ सप्टेंबरपासून गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गोव्यात सावधगिरीची चेतावणी (येलो अलर्ट) लागू केला आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापुढील काही दिवस पावसाचा जोर वाढेल; मात्र तो कधी ओसरेल याविषयी कोणताच अंदाज वेधशाळेने वर्तवलेला नाही.
मागील २ दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. ऑगस्ट मासात सरासरीच्या तुलनेत १३.४ इंच पाऊस अल्प झाला आहे. ऑगस्ट मासाची प्रतिवर्षीची सरासरी २७.६ इंच इतकी आहे; मात्र यंदा या मासात १४.२ इंच पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाचे प्रभारी संचालक एम्. राहुल यांनी दिली.